एक्स्प्लोर

राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार, शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा घटक पक्षांचा आग्रह

नुकतेच त्यांनी चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली नाही तरीही शिरोळमधून निवडणूक लढवण्याचा शेट्टी यांचा विचार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह आघाडीतील घटक पक्षांकडून त्यांना आग्रह होत आहे. राजू शेट्टी देखील निवडणूक लढवण्यास तयार आहेत. नुकतेच त्यांनी चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली नाही तरीही शिरोळमधून निवडणूक लढवण्याचा शेट्टी यांचा विचार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज मुंबईत झाली. घटक पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीने घटक पक्षांसाठी 38 जागा सोडल्या आहेत. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव घटक पक्षांना मान्य नाही. 55 ते 60 जागांचा प्रस्ताव घेऊन घटक पक्षाचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी हेच घटक पक्षांचे नेतृत्व करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. नुकतेच राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करताना विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते.  जर चंद्रकांत पाटलांनी ग्रामीण भागात दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवली तर मग मात्र मी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढणार असे राजू शेट्टी यांनी ठणकावले होते.  शेट्टी म्हणाले होते की, आगामी विधानसभा निवडणूक स्वाभिमानी पक्ष लढवणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी निर्माण करावी अशीच भूमिका स्वाभिमानी संघटनेची आहे असेही शेट्टी म्हणाले होते.  या महाआघाडीमध्ये बहुजन वंचित आघाडीनं सुद्धा यावं असेही शेट्टी यावेळी म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget