Raju Patil Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. राज्यभरातील मतदार मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर पडत आहे. मात्र मतदानाच्या काही तासांआधीच म्हणजे काल (19 नोव्हेंबर) कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. 


कल्याण ग्रामीणमधील आडीवली ढोकळी परिसरातील मनसेची शाखा पोलिसांनी बंद केल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला आहे. तसेच पोलीस मतदार याद्या आणि व्होटर स्लिप घेऊन गेल्याचा दावा देखील राजू पाटील यांनी केला आहे. सत्ताधारी पोलिसांना हाताशी धरून हे करत असतील तर मनसेची फौज मैदानात उतरवू, काय व्हायचं ते होऊदेत, असा इशारा देखील राजू पाटील यांनी दिला. पैसे वाटप आणि दबावतंत्र बंद करा, आडीवली ढोकळी संवेदनशील मतदारसंघ जाहीर करा, असंही राजू पाटील म्हणाले. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या ठेका आम्हीच घेतला नाही,  असा इशारा देखील राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि पोलिसांना दिला आहे.


पोलिसांनी राजू पाटील यांचे आरोप फेटाळले-


राजू पाटील यांनी केलेला आरोप पोलिसांनी खोडून काढला आहे. पोलीस मनसेच्या कार्यालयाकडे गेलीच नाही असा काही प्रकार पोलिसांनी केला नसल्याचे डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय काबदाने यांनी माहिती दिली आहे.


मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई


मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश मा. भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी कसोशीने होईल याकडे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेचा कटाक्ष आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठी, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव असणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय  मोफत बस प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी नेमले आहेत.


...तर मी पण फौज उतरवतो, काय व्हायचं ते होऊदे; राजू पाटील भडकले, Video:



संबंधित बातमी:


Vinod Tawade: विरारच्या विवांता हॉटेलमधील विनोद तावडेंचा आणखी एक व्हिडीओ समोर; दहा मिनिटे बोलू द्या...