Vinod Tawade विरार: विरारच्या कॅशकांड प्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विनोद तावडे एका सभागृहात सभा घेत असल्याचे दिसून येत आहे. 


व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतानाही विनोद तावडे यांनी “दहा मिनिटे बोलू द्या” असे सांगत आहे. कार्यकर्त्यांसोबत चहा घेत असल्याचे कारण पुढे करत त्यांनी सभा घेतली. त्यानंतर मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत असल्याचे कारण दिले होते. विनोद तावडे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. तसेच निवडणूक आयोग आणि कायदा याकडे दुर्लक्ष करत विनोद तावडेंनी कार्यकर्त्यांसमोर भाषण ही केले. यावर बहुजन विकास आघाडीने प्रश्न उपस्थित केला आहे आणि निवडणूक आयोगाकडे कारवाईची ही मागणी केली आहे.


सीसीटीव्ही तपासा, आयोगकडून चौकशी होऊ द्या- विनोद तावडे


वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख मा. हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. हितेंद्र ठाकूर व क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी.


जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केली कारवाई-


वसईच्या तुळींज विवांता हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे आणि भाजपचे काही कार्यकर्ते तेथे पैसे वाटप करत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाची टीम तिथे पोचली. त्या ठिकाणी एसएसटी टीमला नऊ लाख 93 हजार पाचशे रुपये सापडले आहेत. त्याचबरोबर इतर कागदपत्रेही सापडले आहेत. त्या पद्धतीने कार्यवाही सुरू असून पोलिसांनीसुद्धा तशी तक्रार दाखल केली आहे. या हॉटेलची पूर्ण तपासणी करून त्याबाबतीत पूर्ण कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे एक तासाच्या आत सदर बाबतीत गुन्हाही दाखल करण्यात येईल असे मत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला आहे.




संबंधित बातमी:


Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा