Horoscope Today 20 November 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ (Aquarius), मीन राशीचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...


मकर (Capricorn Today Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये परस्पर प्रेम असेल. नोकरीत काम करणाऱ्यांना काही अडचणी येत असतील तर त्या दूर होतील. आज तुम्हाला कोणतीही जोखीम घेणं टाळावं लागेल. कुटुंबातील लोकांशी तुमची चांगली मैत्री होईल. तुमच्या मुलाची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी कोणतीही परीक्षा दिली असेल तर त्याचा निकाल चांगलाच येईल.


कुंभ (Aquarius Today Horoscope)              


कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याकडे पूर्ण लक्ष देणं आवश्यक आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या मनमानी वागणुकीमुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या दीर्घकालीन व्यावसायिक योजनांना गती मिळेल. कोणत्याही वादापासून दूर राहा. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला धडा घ्यावा लागेल.


मीन (Pisces Today Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायाबाबत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. कौटुंबिक कलह वाढल्याने तुमचं मन अस्वस्थ राहील. दोन्ही बाजू ऐकून घेऊनच निर्णय घेतला तर बरं होईल. आज तुमच्यावर खूप कामाचा ताण असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. नोकरीशी संबंधित बाबींवर थोडं लक्ष द्यावं लागेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ, जगणार राजासारखं जीवन