एक्स्प्लोर

राजस्थानात भाजपचा सुपडासाफ, कॉंग्रेसची एकहाती सत्ता

काँग्रेसचा युवा चेहरा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या नेतृत्वात पक्षाने राजस्थानात चमकदार कामगिरी बजावली आहे. राजस्थानात सत्तास्थापन करतानाच सचिन पायलट यांनी टोंक मतदारसंघातही विजय मिळवला.

जयपूर : दर पाच वर्षांनी राजस्थानमधील सत्तापालटाचा सिलसिला कायम राहिला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी झाल्या असल्या, तरी त्यांना आपल्या नेतृत्वात सरकार राखण्यात अपयश आलं आहे. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या नेतृत्वात राजस्थानात एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसचा युवा चेहरा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या नेतृत्वात पक्षाने राजस्थानात चमकदार कामगिरी बजावली आहे. राजस्थानात सत्तास्थापन करतानाच सचिन पायलट यांनी टोंक मतदारसंघातही विजय मिळवला. गेल्या वीस वर्षांत कुठल्याच पक्षाला राजस्थानमध्ये सलग दोन टर्म सत्ता काय राखता आलेली नाही. काँग्रेस आणि भाजप यांची राजस्थानात आलटून पालटून सत्ता येत असते. ही परंपरा मोडून काढण्याची संधी वसुंधरा राजे यांनी गमावली. राजस्थानने वसुंधरा राजे यांना सपशेल नाकारलं. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा असून 199 जागांसाठी मतदान झाले. राजस्थानात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करत आत्तापर्यंतच्या कलांनुसार 101 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 70 जागांवर आघाडी घेतली आहे. Election Results Live Update
  • 4.00 वाजेपर्यंतचे कल : भाजप 70, काँग्रेस+102, इतर 27
  • राजस्थानात 'पायलट' यांच्या नेतृत्वात काँग्रेसची 'भरारी'
  • काँग्रेस बहुमताजवळ, अशोक गहलोत यांच्याकडून चहाचं वाटप
  • भाजप-काँग्रेसमध्ये चुरस वाढली, भाजप 86 आणि काँग्रेस 92 जागा
  • भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज : सचिन पायलट
  • काँग्रेस आघाडीवर परंतु बहुमतपासून दूर, सत्ता स्थापनेसाठी सचिन पायलट आठ अपक्षांच्या संपर्कात
  • झालरापाटन मतदारसंघातून वसुंधरा राजे विजयी
  • भाजप 80, काँग्रेस+96, इतर 23
  • काँग्रेसमुक्तीची भाषा करणारे मुक्त होतील : अशोक गहलोत
  • भाजप 81, काँग्रेस+95, इतर 23
  • भाजप 80, काँग्रेस+101, इतर 18
  • राजस्थानमध्ये काँग्रेसला बहुमत, सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसच्या शतक पार जागा
  • भाजप 80, काँग्रेस+97, इतर 17
  • सुरवातीच्या कलानुसार राजस्थानात काँग्रेसला बहुमत
  • भाजप 78, काँग्रेस+92, इतर 14
  • राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आघाडीवर, भाजपचे युनूस खान मागे
  • राजस्थानात काँग्रेस बहुमतापासून फक्त 10 जागा दूर
  • राजस्थानमध्ये भाजप सरकारचे सात मंत्री पिछाडीवर
  • भाजप 70, काँग्रेस+85, इतर 8
  • जयपूरमध्ये काँग्रेसचा फटाके फोडून जल्लोष साजरा
  • भाजप 55, काँग्रेस+77, इतर 2
  • भाजप 42, काँग्रेस+60, इतर 2
  • राजस्थानात कॉंग्रेसत अर्धशतक पूर्ण
  • राजस्थान : भाजप 30, काँग्रेस+51, इतर 2
  • राजस्थान : भाजप 17, काँग्रेस+38, इतर 0
  • राजस्थानचा पहिला कल भाजपच्या बाजूने, वसुंधरा राजे आघाडीवर, सचिन पायलटही पुढे
  • राजस्थानमध्ये मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी
वसुंधरा राजेंची प्रतिष्ठा पणाला राजस्थानात मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे तर काँग्रेसकडून सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी राजस्थानात निवडणूक झाली. विविध संस्थांच्या एक्सिट पोलमध्ये राजस्थानात काँग्रेसलाच झुकतं माप देण्यात आलं आहे. राज्यात मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल नाराजी असल्याचे दिसून आले. काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांनी सत्ता काबीज करण्यासाठी कसून परिश्रम घेतले आहेत. तर सत्ता कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला होता. राजस्थानमध्ये 200 मतदारसंघ असून 199 जागांसाठी मतमोजणी होणार आहे. येथे बहुमतासाठी 100 जागांची आवश्यकता आहे. राज्यात 7 डिसेंबरला एकूण 74.21 टक्के मतदान झाले. राज्यात एकूण एकूण 3374 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजस्थान 2013 चं पक्षीय बलाबल (200) भाजप – 163 काँग्रेस – 21 बसप – 3 राष्ट्रीय जनता पक्ष - 4 अपक्ष – 9

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
Kisan Sangh on BJP : भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
Thane Crime news: पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
Embed widget