एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मोदींनी जे प्रधानसेवक आणलं, ते वाक्यही जवाहरलाल नेहरुंचं : राज ठाकरे

जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी आपल्या निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलतच नाहीत. संपूर्ण निवडणूक पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांच्यावर केवळ आरोप करताना मोदी दिसत आहेत. मात्र बेरोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्यांबद्दल कधी बोलणार असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात कायम नेहरु, गांधी कुटुंबावर टीका करतात, पण मोदींनी जे प्रधानसेवक आणलं ते वाक्यही जवाहरलाल नेहरुचं आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. तसंच मोदींना चुकीचा इतिहास माहित आहे, अशी टीकाही केली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अर्थात नांदेडमध्ये आज राज ठाकरेंची प्रचार सभा झाली. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आहेत. या सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षात केलेल्या भाषणांच्या क्लिपचा आधार घेत, मोदींनी दिलेली आश्वासनं किती पोकळ होती, हे आपल्या भाषणातून सांगितलं. गेली साडेचार वर्ष मोदींनी जनतेंची फसवणूक केल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी आपल्या निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलतच नाहीत. संपूर्ण निवडणूक पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांच्यावर केवळ आरोप करताना मोदी दिसत आहेत. मात्र बेरोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्यांबद्दल कधी बोलणार असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. नेहरुंच्या वाक्यावरुनच मोदींचं प्रधानसेवक! याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी मोदींचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, "मोदींनी जे प्रधानसेवक आणलं, ते वाक्यही जवाहरलाल नेहरुंचं आहे. दिल्लीतल्या स्मृती भवनमध्ये मोठी पाटी आहे, त्या पाटीवर पंडित नेहरुंचं वाक्य लिहिलं आहे. फक्त त्यांनी वेगळा शब्द वापरला आहे. नेहरुंचं वाक्य असं आहे, "यह देश की जनता मुझे प्रधानमंत्री कहके ना पुकारे, इस देश की जनता मुझे प्रथमसेवक कहके बुलाए." ते 'प्रथमसेवक' यांनी 'प्रधानसेवक' केलं." मोदींना चुकीचा इतिहास माहित "मध्यंतरी एका दक्षिणेतील राज्यात भाषण करताना मोदींनी नेहरुंचा विषय काढला. मोदी म्हणाले होते की शहीद भगतसिंह जेलमध्ये असताना नेहरु परिवारातील कोणी त्यांना भेटायला का नाही गेला? आता गोष्टीचा निवडणुकांशी काय संबंध? रोजच्या जगण्याशी याचा काय संबंध आहे? एकतर मोदींना चुकीचा इतिहास माहित आहे. 1929 सालच्या ट्रिब्यून या वर्तमानपत्रात छापलेल्या बातमीनुसार, पंडित नेहरु हे एकमेव व्यक्ती जे भगतसिंहांना जेलमध्ये दोनदा भेटून, त्यांची विचारपूस करुन आले. आता काँग्रेसी परिवार म्हणजे कोण? तर नेहरुच ना, मग ते दोनदा जाऊन आले. शहीद भगतसिंह जेलमध्ये असताना इंदिराजी 14 वर्षांच्या होत्या, म्हणजे भगतसिंहांना जेलमध्ये जाऊन भेटणं हा विषयच नाही. त्यामुळे राजीव गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी पत्ताच नाही. आता इंदिराजीच 14 वर्षांच्या होत्या तर बाकीच्यांचा विषयच येत नाही."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget