Raj Thackeray on Girish Mahajan : तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला; म्हणाले, 'तो लाकूडतोड्या बरा होता, पण...'
Raj Thackeray on Girish Mahajan: नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित संयुक्त प्रचारसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तपोवन वृक्षतोडीवर भाष्य केले.

Raj Thackeray on Girish Mahajan: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Election 2026) पार्श्वभूमीवर आयोजित संयुक्त प्रचारसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी सत्ताधारी महायुतीवर, विशेषतः भाजप (BJP), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. तपोवनातील वृक्षतोड (Tapovan Tree Cutting), नाशिकचा विकास आणि ‘दत्तक’ शहराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच पोलखोल केली.
तपोवन परिसरातील झाडे छाटण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, “संजय राऊत म्हणाले तसे, यांना तपोवनातील झाडं छाटायची आहेत. त्या महाजनपेक्षा तो लाकूडतोड्या बरा होता, जो सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीला भुलला नाही. पण हे लोक झाडं छाटण्याआधी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि माणसं छाटतात. बाहेरून झाडं मागवून ती आता पक्षात लावली जात आहेत,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
Raj Thackeray on Nashik Tree Cutting: वृक्षतोड करून जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचे नियोजन
मनसेच्या सत्तेत 2012 साली पार पडलेल्या कुंभमेळ्याची (Kumbh Mela) आठवण करून देताना राज ठाकरे म्हणाले की, त्या काळात एकही झाड न तोडता जागतिक स्तरावर कौतुक होईल, असा कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यात आला. मात्र, आता वृक्षतोड करून ही जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचे नियोजन सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “साधुसंत घरी गेल्यानंतर ही जमीन कुणाला द्यायची, हे यांचे आधीच ठरलेले असते,” असा घणाघात त्यांनी केला.
Raj Thackeray on Devendra Fadnavis : राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका
2017 च्या महापालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर ‘दत्तक’ घेण्याचे आश्वासन दिले होते. या विधानावर राज ठाकरेंनी तीव्र शब्दांत टीका केली. “2017 ला फडणवीस नाशिकला आले आणि नाशिक दत्तक घेतो म्हणाले. नाशिककर त्या विधानाला भुलले आणि मनसेने केलेली कामं विसरले. पण दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप पुन्हा कधी नाशिककडे फिरकलाच नाही,” अशी टीका त्यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या




















