एक्स्प्लोर
सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देणार : राहुल गांधी
न्यूनतम आय योजनेअंतर्गत सत्तेत आल्यास देशातील प्रत्येक घटकाला न्याय (NYAY) देणार असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.
![सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देणार : राहुल गांधी Rahul Gandhi promises that India 20 percent most poor families will get yearly 72000 rupees सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देणार : राहुल गांधी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/25141619/Rahul-Gandhi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. 2019 मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरीब कुटुंबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणार, असं राहुल गांधी यांनी जाहीर केलं. दिल्लीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
किमान उत्पन्न योजनेअंतर्गत सत्तेत आल्यास देशातील प्रत्येक घटकाला न्याय देणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली. हे न्याय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून (न्यूनतम आय योजना - NYAY) असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. याचा थेट फायदा देशातील 5 कोटी कुटुंबांना म्हणजेच 25 कोटी जनतेला या योजनेचा लाभ होण्याचा दावा काँग्रेस अध्यक्षांनी केला.
एखाद्या कुटुंबाला सन्मानजनक आयुष्य जगण्यासाठी 12 हजार रुपयांची आवश्यकता असल्याचं असं राहुल गांधींनी सांगितलं. यासाठी त्यांनी देशातील गरीब कुटुंबाला मासिक 12 हजार उत्पन्नाची हमी दिली आहे. या 12 हजार रुपयांचं उत्पन्न कसं पूर्ण होणार हे देखील त्यांनी सांगितलं. समजा, एका कुटुंबाचं उत्पन्न महिना 5 हजार रुपये आहे, तर या योजनेअंतर्गत त्यांना महिन्याला 7 हजार रुपये मिळतील. जर कुटुंबाचं उत्पन्न 10 हजार रुपये असेल त्यांना दोन हजार रुपये मिळणार. हा फरक थेट बँक खात्यात जमा होईल. पण हे सगळं काँग्रेस सत्तेत आल्यावर होणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेस, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं. आता आमचं सरकार आल्यास किमान उत्पन्नाचं आश्वासनही पूर्ण करु.
तसंच मोदी केवळ अनिल अंबानी यांच्यासारख्या लोकांचीच मदत करतात, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
दरम्यान, काँग्रेस पक्ष उद्या निवडणुकीचा जाहीरनामा घोषित करणार आहे. त्याच्या एक दिवस आधी राहुल गांधींनी ही मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात "राईट टू हेल्थ"चाही दावा करु शकतं.
VIDEO : राहुल गांधींची पत्रकार परिषद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)