Maharashtra Vidhan Sabha Election 2024: पत्रकारांना पगार घेऊन मुलांचे शिक्षण करायचे आहे. पोटाची भूक भागवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना पगार हवा असल्याने त्यांना मालकाचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने पत्रकार हे गुलाम आहेत, अशी जहरी टीका संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकारांवर (Journalists) केली आहे. त्यांच्या या टीकेवरून पत्रकारांमध्ये संताप वाढू लागला आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शनिवारी जाहीर सभा झाली. या सभेत मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी मीडियालच लक्ष्य केले.
पत्रकारांना मालकांचे ऐकावेच लागतं, एक तऱ्हेने ते गुलाम आहेत
ते म्हणाले, मागच्या वर्षभरापासून संविधान, जातनिहाय जनगणना आणि 50 टक्के आरक्षण मर्यादेची भिंती तोडणार आणि हे लोकसभेत करून दाखविणार असे सांगत आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगत आहेत. त्यांची मेमरी लॉस झाली आहे. त्यांच्यासमोरच हे सर्व मुद्दे मांडत असतानाही त्यांना याचा विसर पडला आहे. हे सर्व मीडियावले दाखवित नाही. हे सर्व त्यांचेच आहेत. हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा हे सर्व माझ्याकडे पाहून हसतात. आम्ही त्यांचेच असल्याचे सांगत हसतात. तुमचे नाहीच असेही सांगतात. मात्र त्यांची चूक नाही. हे मला आवडतात.
पण, त्यांना पगार घ्यायचा आहे. मुलांचे शिक्षण करायचे आहे. त्यांच्या पोटाची भूक शमवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना मालकांचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने हे गुलाम आहेत. त्यामुळे यांच्याशी माझी लढाई नाही. हे आमचे काहीही दाखविणार नाही. असे म्हणत राहुल गांधी यांनी मीडियालच लक्ष्य केलंय. मात्र पत्रकारांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे दिसते आहे.
पत्रकारांमध्ये संतापाची लाट
दरम्यान, याच मुद्यावरून महाराष्ट्र संपादक परिषद मुंबईचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला आहे. राहुल गांधीजी आपण लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहात.आपण सत्ताधाऱ्याविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करणे अपेक्षित आहे. मात्र आपण पत्रकारांविरुद्धचा आवाज उठवत आहात, त्यांना गुलाम म्हणत आहात. वर्षानुवर्षे निष्ठेने आपली लेखणी जिझवणाऱ्या तमाम पत्रकारांचा हा जाहीर अपमान आहे. आपल्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो.
समाजाच्या समस्या चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यापेक्षा आपण प्रत्येक सभेत पत्रकारांना गुलाम म्हणता. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच पत्रकार आपल्या या विधानाने कमालीचे दुखावलेले आहेत. राजकारणात तुम्ही कोणत्या पक्षावर टीका करायची कसे बोलायचे हा तुमचा अधिकार आहे. पण तुमच्या व कोणत्याही पक्षाच्या राजकारणाशी घेणेदेणे नसणाऱ्या पत्रकारांचा असा जाहीरपणे पाणउतारा करणे योग्य नसल्याचे प्रकाश कुलथे म्हणाले.
हे ही वाचा