Sharad Pawar : ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. माढा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या टेंभुर्णीतील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मला देखील ईडीची (ED) नोटीस आली होती. मी राज्य सरकारी बँकेचे पैसे काढल्याचे सांगण्यात आले होते. पण मी राज्य सहकारी बँकेचा सभासद देखील नव्हतो, तरी मला नोटीस आली. मी ईडीच्या कार्यालयाच्या जवळ गेलो त्यानंतर, अधिकारी आणि पोलीस प्रशासन म्हणले आमची चूक झाली. त्यांनी मला हात जोडल्याचे शरद पवार म्हणाले.
या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नाही
दोन वर्षात महाराष्ट्रात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले आहेत. म्हणजेच दर तासाला पाच महिलांवर या महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रातील 64 हजार महिला आणि लेकी बेपत्ता आहेत. शिंदे-फडणवीस अशा राज्यकर्त्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही असेही पवार म्हणाले. तसेच 62 लाख मुले राज्यात बेरोजगार आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शरद पवार म्हणाले. मोदींनी उद्योगपतींचे 16000 कोटींचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे पाच ते दहा हजारांचे कर्ज माफ केले नाही. या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नसल्याचे शरद पवार म्हणाले.
पक्ष फुटला त्यावेळी हा माढ्याचा गडी कुठे गेला कळलाच नाही, पवारांचा आमदार शिंदेंना टोला
माझ्या खासदारकीची निधीसुद्धा माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांना विश्वासावर खर्च करायचे अधिकार दिले होते. पण राज्यात सरकार बदलले, आपला पक्ष फुटला त्यावेळी हा माढ्याचा गडी कुठे गेला कळलाच नाही असे शरद पवार म्हमाले. मी विचारले तेव्हा ईडीची भीती आहे असे सांगितले होते असं शरद पवार म्हणाले. संकट आल्यावर नंतर ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाची भीती नाही असेही शरद पवार म्हणाले. गैर कारभार केल्यावर भीती वाटते असेही पवार म्हणाले. निवडणुका लागल्यानंतर आणदार बबनदादा शिंदे हे परत माझ्याकडे आले. चुकलं म्हणाले. मी पण म्हणलं, चुका पोटात घेऊ, संधी देऊ असे असे पवार म्हणाले. त्यांनी तिकीट मागायला आलो असल्याचे सांगितले. ते चार पाच वेळा आले. मी म्हणलं आता नव्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे. पण त्यांच्या डोक्यात नवा म्हणजे एकच होता तो म्हणजे त्यांचा लेक असा टोला देखील पवारांनी आमदार शिंदेंना लगावला. 40 वर्ष मी तुम्हाला मदत केली. तुमच्या कामात लक्ष घालण्याची तयारी मी ठेवली. सीना माढा सिंचन योजनेसला निधी दिला. तुमच्या कारखान्याला मी मदत केल्याचे शरद पवार म्हणाले.
हे कुटुंब संकटाच्या
महत्वाच्या बातम्या:
जे सरकार महिलांचं, मुलींचं रक्षण करु शकत नाही, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, शरद पवारांचा हल्लाबोल