एक्स्प्लोर

अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, विखे पाटलांचा गर्भित इशारा

सुजय विखे पाटील राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्यास तयार नसल्याची माहिती आहे. काँग्रेसमधून तिकीट न दिल्यास वेगळा विचार करण्याचा त्यांचा पवित्रा आहे. सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरुन राधाकृष्ण विखे पाटलांना हायकमांडचं बोलावणं आलं होतं.

नवी दिल्ली : अहमदनगरच्या जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नाराज आहेत. अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, असा गर्भित इशारा विखे पाटलांनी दिला. विखे पाटील दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले होते. सुजय विखे पाटील राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्यास तयार नसल्याची माहिती आहे. काँग्रेसमधून तिकीट न दिल्यास वेगळा विचार करण्याचा त्यांचा पवित्रा आहे. सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरुन राधाकृष्ण विखे पाटलांना हायकमांडचं बोलावणं आलं होतं. अहमदनगरची जागा सुटत नसल्यामुळे विखे पाटलांची नाराजी आहे. पक्षातल्या अंतर्गत राजकारणाबद्दलही त्यांनी हायकमांडकडे तक्रार केली. विरोधी पक्षनेत्याची ही अवस्था होत असेल तर  इतरांना काय सांगायचं? अशी उद्विग्न प्रतिक्रिया विखे पाटलांनी राहुल गांधींकडे व्यक्त केली.
सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर, तर राधाकृष्ण विखे पाटील...
शेवटी अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागणार, असं अत्यंत सूचक आणि गर्भित इशारा असलेलं वक्तव्य विखे पाटलांनी केलं. याआधी, सुजय विखे पाटलांचा भाजपप्रवेश थांबवण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला होता. सुजय यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला. काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत यासंदर्भात फोनवर चर्चा झाली असून राष्ट्रवादीला प्रस्ताव मान्य असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे नेते पवारांशी याबाबत चर्चा करणार आहेत. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाला अहमदनगरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनीही विरोध केला. भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी सुजय विखे यांच्या प्रवेशाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घोषणाबाजी केली. सुजय विखे पाटील अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने सुजय यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. सुजय 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :
आघाडीतील अहमदनगरचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधी मध्यस्थी करणार
सुजय विखे पाटील राष्ट्रवादीकडून अहमदनगर लोकसभेची जागा लढवणार?

महत्त्वाच्या बातम्या

India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget