एक्स्प्लोर
Advertisement
आता 56 मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवून दाखवा, मनसेकडून भाजपवर 'पेपर स्ट्राईक'
या उत्तरानंतर आता मनसेकडून भाजपला एक 56 मार्कांची प्रश्नपत्रिका देत 'पेपर स्ट्राईक' केला आहे. या प्रश्नांची उत्तरं देण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.
मुंबई : सध्या गाजत असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ ला भाजपने आज ‘आता बघाच तो व्हिडीओ’ म्हणत उत्तर दिले. या उत्तरानंतर आता मनसेकडून भाजपला एक 56 मार्कांची प्रश्नपत्रिका देत 'पेपर स्ट्राईक' केला आहे. या प्रश्नांची उत्तरं देण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.
मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी ह्या प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर जारी केल्या आहेत. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी 2 दिवसांचा वेळ आहे, असेही सांगण्यात आले आहे.
यामध्ये 'पाकिस्तानच्या कुठल्या नेत्याला मोदी पंतप्रधान व्हावे असं वाटतं? , शेतकऱ्यांना साले कोण म्हणालं ?, 15 लाखांचा जुमला कुणी दिला?, जवानांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त वक्तव्य कुणी केलं? मुलींना पळवून आणून देतो असं कोणता नेता म्हणाला? यासह भाजपला कोंडीत पकडणारे अनेक प्रश्न केले आहेत. भाजपचं ‘आता बघाच तो व्हिडीओ’, राज ठाकरेंच्या आरोपांवर भाजपचा खुलासा दरम्यान, सध्या गाजत असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ ला भाजपने आज ‘आता बघाच तो व्हिडीओ’ म्हणत उत्तर दिले. राज ठाकरेंच्या पोलखोल सत्राला उत्तर देण्यासाठी भाजपचं ‘आता बघाच तो व्हिडीओ’ साठी सभेचे आयोजन केले होते. रंगशारदा सभागृहात दोन स्क्रीन लावून राज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवर खुलासा केला. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, राज ठाकरेंनी 32 खोट्या प्रकरणात आरोप केले. हे आरोप आरटीआयच्या माध्यमातून केले का? जे फुटेज घेतले ते भाजपच्या व्हेरिफाईड अकाउंटवरून घेतल्या का? ज्या बातम्या दाखवल्या त्या पूर्ण दाखवल्या का? , असे ते म्हणाले. अनव्हेरिफाईड सोरर्सेस वापरून खोटे आरोप राज ठाकरेंनी केले आहेत, असेही ते म्हणाले.भाजपवर नवी मुंबई मनसेचा "पेपर स्ट्राईक" ५६ मार्कांची प्रश्नपत्रिका केली प्रकाशित.. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना उत्तरांसाठी २ दिवसांचा अवधी (शेलार राजसाहेब यांच्या प्रश्नाना उत्तर देता आले नाहीं तर कीमान ही प्रश्नपत्रिका तरी सोडवा)@ShelarAshish @Dev_Fadnavis @narendramodi pic.twitter.com/ppwESMbuqf
— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) April 27, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement