एक्स्प्लोर

Punjab Election Result : पंजाबमध्ये 'आप' ची मुसंडी; बहुमताच्या दिशेनं वाटचाल, काँग्रेस पिछाडीवर

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप जवळपास 60 जागांवर आघाडीवर आहे.

Punjab Election Result : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल यायला सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आप जवळपास 60 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. तर काँग्रेस पंजाबमध्ये 18 जागांवर आघाडीवर आहे. तर अकाली दल 9 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, महत्वाची माहिती म्हणजे पंजबमधील दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि विद्यमान मुख्यमंत्री असणारे चरणजीत सिंह चन्नी हेही सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहेत. तसेच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे देखील पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंह हे देखील पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच सोनू सूदची बहिण मालविका सूद देखील पिछाडीवर आहे. ती काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे. 

पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117  जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. मतदारांनी यावेळी समिश्र प्रतिसाद दर्शवल्याने 65.32 टक्के मतदानाची नोंद पंजबमध्ये झाली होती. दरम्यान, निवडणुकांच्या निमित्ताने पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी याठिकाणी प्रचार केला होता. दरम्यान काँग्रेस पक्षाचा विचार करता सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर मोठी जबाबदारी असून या निवडणुकीसाठी तेच पक्षाचा चेहरा आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चमकोर साहिब आणि भदौर अशा दोन ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काँग्रेसचा आणखी एक मोठा चेहरा म्हणजे नवज्योत सिंह सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून उभे आहेत. तर यंदा एक्झिट पोलमध्ये विजयी आप पक्षाचा मोठा चेहरा म्हणजे भगवंत मान हे धुरी मतदार संघातून उभे आहेत.


पंजाबमध्ये या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला?  

चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - चमकोर साहिब
चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - भदौर
नवज्योत सिंह सिद्धू (काँग्रेस) - अमृतसर पूर्व
विक्रम मजिठिया (अकाली दल ) - अमृतसर पूर्व
भगवंत मान (आप) - धुरी
कॅ.अमरिंदर सिंह (पीएलसी) - पतियाळा शहर
प्रकाश सिंह बादल (अकाली दल) - लंबी
सुखबीर सिंह बादल (अकली दल) - जलालाबाद
सुखजिंदर रंधावा (काँग्रेस) - डेरा बाबा नानक
मालविका सूद (काँग्रेस) - मोगा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget