एक्स्प्लोर

Punjab Election Result 2022: कोण जिंकणार पंजाबचं सिंहासन? आपचं पारडं जड, काँग्रेसचा करिष्मा पुन्हा चालणार का?

पंजाबमध्ये  निवडणुकांच्या निमित्ताने बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या होत्या. अवघ्या काही तासांमध्येच पंजाबमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Punjab Election Result 2022: आज देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. अवघ्या काही तासांमध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या पाच राज्यामध्ये सर्वा जास्त चर्चा झाली ती पंजाबची. पंजाबमध्ये  निवडणुकांच्या निमित्ताने बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या होत्या. सध्या पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर पंजाबला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्वत राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती. आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये जोरदार टक्कर दिली आहे. एक्झिट पोलमध्ये आप पक्षाला बहुमत मिळाल्याने काँग्रेसला पंजाबमध्ये हादरा बसण्याची शक्यता आहे.
 
पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117  जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. मतदारांनी यावेळी समिश्र प्रतिसाद दर्शवल्याने 65.32 टक्के मतदानाची नोंद पंजबमध्ये झाली होती. दरम्यान, निवडणुकांच्या निमित्ताने पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी याठिकाणी प्रचार केला होता. दरम्यान काँग्रेस पक्षाचा विचार करता सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर मोठी जबाबदारी असून या निवडणुकीसाठी तेच पक्षाचा चेहरा आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चमकोर साहिब आणि भदौर अशा दोन ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काँग्रेसचा आणखी एक मोठा चेहरा म्हणजे नवज्योत सिंह सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून उभे आहेत. तर यंदा एक्झिट पोलमध्ये विजयी आप पक्षाचा मोठा चेहरा म्हणजे भगवंत मान हे धुरी मतदार संघातून उभे आहेत.


पंजाबमध्ये या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला?  

चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - चमकोर साहिब
चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - भदौर
नवज्योत सिंह सिद्धू (काँग्रेस) - अमृतसर पूर्व
विक्रम मजिठिया (अकाली दल ) - अमृतसर पूर्व
भगवंत मान (आप) - धुरी
कॅ.अमरिंदर सिंह (पीएलसी) - पतियाळा शहर
प्रकाश सिंह बादल (अकाली दल) - लंबी
सुखबीर सिंह बादल (अकली दल) - जलालाबाद
सुखजिंदर रंधावा (काँग्रेस) - डेरा बाबा नानक
मालविका सूद (काँग्रेस) - मोगा

पंजाब निवडणुकांमधील गाजलेले मुद्दे

शेतकरी आंदोलनातील पंजाब
पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद
कॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
अंमली पदार्थांचं सावट
पंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न

2017 ची परिस्थिती  

2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. 117 जागापैकी काँग्रेसने 77 जागावर विजय मिळवला होता. तर अकाली दल 15, भाजप 3 आणि आम आदमी पार्टीला 20 जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती. त्यामुळे यंदा काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार की आम आदमी पार्टी बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे. कारण खरी टक्कर आप आणि काँग्रेसमध्येच असल्याचे बोलले जात आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget