Punjab Election: पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण चंगलेच तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. पंजाबजे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य पंजाब दौऱ्यामुळे माझ्या हेलिकॉप्टरला परवानगी न मिळाल्याच्या मुद्यावरुन चन्नी यांनी टीका केली आहे. काल पंतप्रधानांचा कार्यक्रम होता, त्यामुळे मला दिवसभर मला प्रचार करण्याची परवानगी नव्हती. मी दहशतवादी आहे का? असा सवाल चन्नी यांनी केला आहे.
 
फिरोजपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार न केल्यामुळे मला रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चन्नी यावेळी म्हणाले. त्याचबरोबर चन्नी यांनी केजरीवालांवर हल्ला चढवत त्यांना लबाड म्हटले आहे. केजरीवाल यांना आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांचा पराभव करायचा आहे, असा दावा देखील चन्नी यांनी केला आहे.


सध्या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडली. तसेच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील काल मतदान पार पडले. दरम्यान, येत्या 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये देखील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा हे काल पंजाबच्या दैऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याला संयुक्त किसान मोर्चाने (Sanyukt Kisan Morcha) विरोध दर्शवला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जालंधरमध्ये भव्य सभा पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी संपर्क साधला यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.


अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या लोकांची कामे केली नाहीत, आश्वासने पूर्ण केली नाहीत. सदैव भाजप-अकालीसोबत असल्याने नुकसान झाल्याचे चन्नी म्हणाले. वाळू माफियांच्या आरोपांवर चन्नी म्हणाले की, ते खोटे आरोप करतात आणि नंतर माफीही मागतात. राज्यपालांकडे तक्रार केली ज्यामध्ये आरोप खोटे असल्याचे आढळून आल्याचे चन्नी म्हणाले. यावेळी चन्नी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील आरोप केले. केजरीवाल स्वतः भगवंत मान यांचा पराभव करू इच्छित आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: