एक्स्प्लोर
पुण्यात काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा, चौकीदाराच्या हस्ते प्रकाशन
समतभूमी अर्थात महात्मा फुले वाड्यात सामान्य नागरिकांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. यामध्ये महिला, पहिला मतदार, चौकीदार यांचा समावेश होता.

पुणे : पुण्यात काँग्रेसने आपला स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केला आहे. विशेष म्हणजे खऱ्याखुऱ्या चौकीदाराच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्यात काँग्रेसकडून मोहन जोशी तर भाजपकडून गिरीश बापट जोरदार प्रचार करत आहेत. समतभूमी अर्थात महात्मा फुले वाड्यात सामान्य नागरिकांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. यामध्ये महिला, पहिला मतदार, चौकीदार यांचा समावेश होता. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी आणि कार्यकर्त्यांनी फुले वाड्यात फुले दाम्पत्याला अभिवादन करुन पुणेकरांसाठी जाहीरनामा सादर केला. काँग्रेसने दोन एप्रिलला जाहीरनामा प्रकाशित केला होता. सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करणार असल्याची सर्वात मोठी घोषणा केली होती काँग्रेसच्या पुण्यातील जाहीरनाम्यातील काही ठळक वैशिष्ट्यं *सुरक्षित पुणे *गतिमान पुणे *हरित पुणे *आनंदी पुणे ही पुण्याच्या विकासाची चतुःसूत्री तयार करण्यात आली आहे काँग्रेसच्या पुण्यातील जाहीरनाम्यात आणखी काय? *प्रत्येक घरातील एका व्यक्तीला रोजगार देणार *महिला सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणार *शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार *शहरात शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येत असतात त्यांच्यासाठी अभ्यासिका वाढवणार *याचबरोबर पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ आणणार, नदीकाठ रस्ता करणार, शंभर टक्के शहर डिजिटल करणार, प्रत्येक झोपडपट्टीवासियाला घर देणार, पुणेकरांना मुबलक पाणी देणार
आणखी वाचा




















