एक्स्प्लोर

भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर, प्रकाश मेहता समर्थकांनी पराग शाहांची गाडी फोडली

भाजपची चौथी उमेदवार यादी आज जाहीर झाली. यात अनेकांचा पत्ता कट करण्यात आला. त्यात प्रकाश मेहता यांचाही समावेश आहे. भाजपने घाटकोपर पूर्वमध्ये प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शाह यांना उमेदवारी दिली.

मुंबई : मुंबईत भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. घाटकोपरमध्ये प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे समर्थक भिडले. मेहतांच्या समर्थकांनी भाजपचे उमेदवार पराग शाह यांच्या गाडी रोखून तोडफोड केली. प्रकाश मेहता आणि किरीट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि गाडी पुढे जाऊ दिली. भाजपची चौथी उमेदवार यादी आज जाहीर झाली. यात अनेकांचा पत्ता कट करण्यात आला. त्यात प्रकाश मेहता यांचाही समावेश आहे. भाजपने घाटकोपर पूर्वमध्ये प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शाह यांना उमेदवारी दिली. यानंतर पराग शाह सदिच्छा भेटीसाठी प्रकाश मेहता यांच्या निवासस्थानी गेले होते. परंतु इथे त्यांना मेहता समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी रोखून तोडफोड केली. फॉर्म भरण्यासाठी जाऊ देणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कट, भाजपची चौथी यादी जाहीर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर, प्रकाश मेहता समर्थकांनी पराग शाहांची गाडी फोडली अखेर प्रकाश मेहता, किरीट सोमय्या यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं. "भांडण करणं, गाड्या फोडणं ही आपली संस्कृती नाही," असं प्रकाश मेहतांनी सांगितलं. परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. "तुम्ही अपक्ष निवडणूक लढा आम्ही तुम्हाला निवडून आणू," अशा घोषणा कार्यकर्ते करत होते. दरम्यान, घाटकोपर पूर्व हा भाजपचा गड समजला जातो. प्रकाश मेहता भाजपचे मुंबईतील एकमेव उमेदवार आहे, ज्यांनी सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. मागील 25 वर्षांपासून ते घाटकोरचं प्रतिनिधित्त्व करत आहेत. परंतु यंदा त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. समर्थक मेहतांना अपक्ष निवडणूक लढवण्याची विनंती करत आहेत. त्यामुळे आता प्रकाश मेहता काय निर्णय घेणार हे पाहंण औत्सुक्याचं असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget