एक्स्प्लोर

माढा लोकसभेत उमेदवारीवरुन रणकंदन, नेमकं काय झालं?

गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरुन रणकंदन सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण माढ्यातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर माढा लोकसभेला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे.

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघ गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या काही दिवसांपासून माढ्याच्या उमेदवारीवरुन रणकंदन सुरु आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण माढ्यातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर माढा लोकसभेला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. परंतु दररोज माढा लोकसभेवरुन वातावरण तापत आहे. माढ्यात नेमकं काय नाट्य झालं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात माढा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला त्यानंतर पवार घराण्यातील तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नको असे सांगत शरद पवारांनी माघार घेतली माघार घेताना विजयसिंह मोहिते-पाटील यांनी निवडणूक लढवावी असे पवारांनी जाहीर केले परंतु विजयसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांचा मुलगा रणजितसिंह यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला आणि माढ्यातील राजकारण बदलले रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीला माढ्यातील स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या साखर कारखान्याने पैसे थकवल्याने त्यांच्याबद्दल माढ्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, हे विरोधामागचे प्रमुख कारण संजय शिंदे हे भाजपाच्या मदतीने सोलापूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी बसले असून ते राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू आहेत माढ्याबाबत मुंबईत रामराजे निंबाळकर यांनी बैठक बोलवली होती त्याला बबन शिंदे उपस्थित नव्हते. कारण मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध होता शरद पवार गेल्या काही महिन्यांपासून संजयमामा शिंदे यांचे जाहीर कार्यक्रमातून कौतुक करत आहेत. शरद पवारांची ही खेळी सुरु असताना दुसऱ्या बाजूला मोहिते-पाटील भाजपाच्या संपर्कात होते विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीशी संपर्क तोडला आणि दोन दिवसात रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रणजितसिंहांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी नाराज होईल असे वाटत होते. परंतु सुंटीवाचून खोकला गेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये होती मोहिते पाटील स्वतःहून दूर झाल्याने संजय शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले मोहिते पाटील नाट्य सुरू असताना भाजपनेही संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही अखेरीस आज शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय मामा शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे सोलापूरात समविचारी आघाडी असून त्यात माढा-करमाळ्याचे संजय शिंदे यांच्यासह माळशिरसचे उत्तम जानकर, सांगोल्याचे शहाजी पाटील, माणचे जयकुमार गोरे, फलटणचे रणजितसिंह निंबाळकर यांचा समावेश आहे या सगळ्यांची मदत संजय शिंदे यांना होण्याची शक्यता असून याशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद आणि मोहिते-पाटील यांच्याविरोधातील गट संजय शिंदेच्या पाठिशी असणार आहे त्यामुळे माढ्यातील लढत चुरशीच्या लढतीपैकी एक असणार आहे व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget