एक्स्प्लोर

आंदोलनासाठी निघालेल्या उस्मानाबादच्या शिवसैनिकांना पोलिसांनी माघारी धाडले

शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारल्याने त्यांचे समर्थक आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

मुंबई : शिवसेनेचे उस्मानाबादमधील खासदार रवींद्र गायकवाड यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारल्यामुळे गायकवाड समर्थकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गायकवाड यांचे समर्थक आंदोलन करण्यासाठी शनिवारी रात्री उस्मानाबादहून मुंबईकडे रवाना झाले. परंतु याबाबतची माहिती मिळताच मध्यरात्री एकच्या सुमारास पोलिसांनी या आंदोलक शिवसैनिकांना तुळजापूर येथे अडवून परत पाठवले. परंतु  गायकवाड समर्थकांनी इतर वाहनांची व्यवस्था करत रात्री पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला. गायकवाड समर्थक आज मुंबईत मातोश्री या निवसस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राजीनामे देणार आहेत. लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर गायकवाडांच्या समर्थकांनी शनिवारी उमरगा येथे मेळावा घेतला होता. या मेळाव्यात ठरल्याप्रमाणे गायकवाडांचे समर्थक असलेले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपआपले राजीनामे देण्यासाठी व आंदोलनासाठी शनिवारी रात्री मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, बसमध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात होती. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तुळजापूर येथे मध्यरात्री एकच्या सुमारास या समर्थकांच्या बसेस अडवल्या. यानंतर त्यांना नोटीस बजावून परत पिटाळण्यात आले. तरिही रातोरात इतर वाहनांची व्यवस्था करुन अनेक कार्यकर्ते पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाले. शिवसेनेने नुकत्याच जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार सर्वच विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. परंतु उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी मात्र रद्द करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात चपलेने मारहाण केल्याने गायकवाड वादात सापडले होते. या वादामुळेच उस्मानाबादमधून शिवसेनेने गायकवाड यांच्याऐवजी पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
Mhada Pune Lottery 2026 : गुड न्यूज, म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4462 घरांची लॉटरी जाहीर, घरांच्या किमती 13 लाखांपासून सुरु
पुण्यात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांना सुवर्णसंधी, म्हाडाकडून 4462 घरांची लॉटरी जाहीर, 13 लाखांपासून घरांच्या किमती सुरु
Embed widget