एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात नरेंद्र मोदींची सभा
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांविरोधात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर रिंगणात उतरले आहेत. नांदेडमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये आज नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर मोदींची ही महाराष्ट्रातली तिसरी सभा आहे. संध्याकाळी 6 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांविरोधात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर रिंगणात उतरले आहेत. नांदेडमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
यापूर्वीच्या दोन्ही सभांमध्ये नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे नांदेडमध्ये मोदी नेमकं काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकीकडे, अशोक चव्हाणांसह अनेक नेते निवडणूक लढवण्याबाबत फारसे उत्सुक नव्हते, असं म्हटलं जात होतं. काँग्रेसचे दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये जात असल्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसची पडझड होत आहे. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला मोदी सुरुंग लावणार, की चव्हाण आपला गड राखण्यात यशस्वी होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement