एक्स्प्लोर

जोरदार शक्तीप्रदर्शन करत वाराणसीमधून पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल

पंतप्रधानांनी गुरुवारी रोड शो करुन आपली ताकद दाखवली होती. आजही मोदींच्या उमेदवारीला एकजूटपणा दाखवण्यासाठी एनडीएचे सर्व नेते सहभागी झाले होते.

वाराणसी : वाराणसीचं रण पुन्हा एकदा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (26 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाश सिंह बादल यांच्यासह एनडीए घटपक्षातीस दिग्गज नेते उपस्थित होते. पंतप्रधानांनी गुरुवारी रोड शो करुन आपली ताकद दाखवली होती. आजही मोदींच्या उमेदवारीला एकजूटपणा दाखवण्यासाठी एनडीएचे सर्व नेते सहभागी झाले होते. यावेळी मोदींनी एनडीए घटकपक्षातील सर्वात ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. वाराणसीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी देशातल्या नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं. नरेंद्र मोदी वाराणसीतून दुसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. 2014 मध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती. मोदींचा तोच करिष्मा आता 2019 लाही चालणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. जोरदार शक्तीप्रदर्शन करत वाराणसीमधून पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल सर्व समाजाचे प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी (25 एप्रिल) आयोजित ऐतिहासिक रोड शोनंतर पंतप्रधानांनी काशीमध्ये सभेला संबोधित करुन जनतेकडून उमेदवारी अर्ज करण्याबाबत परवानगी मागितली होती. मागच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना चार सूचक विशेषत: त्यांच्यासोबत उपस्थित होते. यंदा पंतप्रधान मोदींच्या उमेदवारी अर्जासाठी ज्या सूचकांची नावं आहेत, त्यात चौकीदारापासून राजा डोमच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश आहे. यंदा राजा डोमच्या कुटुंबातील जगदीश चौधरी हे पंतप्रधान मोदींचे सूचक बनले. तर पटेल धर्मशाळेचे रामशंकर पटेल हे देखील मोदींचे सूचक होते. नरेंद्र मोदींच्या इतर दोन सूचकांमध्ये पाणिनी कन्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अन्नपूर्णा शुक्ला आणि चौकीदारांमधील एकाचा समावेश होता. सूचकांद्वारे पंतप्रधान मोदींना सर्व समाजाचं प्रतिनिधित्व दाखवायचं होतं. त्यामुळे राजा डोम कुटुंबासह अन्नपूर्णा शुक्ला यांना मोदींचे सूचक बनवलं. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी अन्नपूर्णा शुक्ला यांचे आशीर्वादही घेतले. 2014 मधील सूचक पंतप्रधान मोदी 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढले होते, त्यावेळी त्यांच्या प्रस्तावकांची विशेष निवड करण्यात आली होती. मागील वर्षी गिरीधर मालवीय, शास्त्रीय गायक छन्नू लाल मिश्र, मल्ल समाजातून भद्रा प्रसाद निषाद आणि बुनकर समाजातून अशोक कुमार हे मोदींचे प्रस्तावक होते. 2014 मध्ये शहरातील  प्रसिद्ध चहावाला पप्पूही नरेंद्र मोदींचा प्रस्तावक बनला होता. मागील वर्षी मोदींनी 24 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Embed widget