UP Election 2022 : आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यातही या पाच राज्यांमधील सर्वात मोठे आणि महत्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे. "2017 च्या आधी उत्तर प्रदेशमध्ये विकासाच्या नदीचे पाणी बनावट समाजवाद्यांचा परिवार आणि त्यांच्या नातेवाईकांकडे अडले होते. या लोकांना सामान्य नागरिकांना तहान लागलेल्याचे काही नाही. हे फक्त आपली तहान भागतवत आहेत. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी अखिलेश यादव यांच्यासह समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. पंतप्रधान प्रथम या रॅलीसाठी प्रत्यक्षात उपस्थित राहणार होते. परंतु, खराब हवामानाळे ते रॅलीच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून रॅलीला संबोधित केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "उत्तर प्रदेशमधील भाजपचे सरकार शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान परत करण्यास कटिबद्ध आहे. गेल्या पाच वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दीड लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम या आधीच्या दोन सरकाची एकत्र केली तरी दीड लाख होत नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये ऊस दरापासून ते उसाची थकबाकी देण्यापर्यंत सर्वत्र खोटे समाजवादी होते, असा घणाघाती आरोप नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.
"पूर्वीच्या सरकारमध्ये खतासाठी शेतकऱ्यांनी मार खाल्ला आहे. ज्या सरकारने शेतकऱ्यांना हे दिवस दाखवले ते शेतकऱ्यांचा कधीच विकास करणार नाहीत. ते शेतकऱ्यांची फसवणूकच करू शकतात. योगी आदित्यनाथ सरकारने आधीच्या सरकारच्या तुलनेत दुप्पट गहू एमएसपीवर खरेदी केला आहे. आज जे शेतकऱ्यांची दिशाभूल करू पाहत आहेत, त्यांना हे विचारायला हवे की, त्यांचे सरकार असताना या भागात किती वीज दिली? असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी यावेळी उस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
- UP Election : श्रद्धेची पर्वा न करणाऱ्यांना आता स्वप्नात कृष्ण दिसतोय; PM मोदींचा अखिलेश यादवांवर हल्लाबोल
- Arvind Kejriwal on Majha Katta : 'मी देशातील सर्वांत इमानदार नेता, पंतप्रधान मोदी यांनी स्वत: दिलं प्रमाणपत्र' - अरविंद केजरीवाल
- Arvind Kejriwal on Majha Katta : पंजाबच्या आगामी निवडणूकींच्या सर्व्हेत 'आप'चं पारडं जड का?, केजरीवालांनी स्वत: सांगितलं कारण
- ABP C Voter Survey: काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा कुणाला होणार फायदा? पाहा जनतेचा कौल