UP Assembly Election 2022: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांमध्ये रॅलींवर निर्बंध आणल्यानंतर व्हर्चुअल रॅलींवर भर दिला जात आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रचार सभा आज पार पडणार आहे. पाच राज्यांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची ही पहिली व्हर्चुअल रॅली असणार आहे. या रॅलीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील व्हर्चुअली सहभागी होणार आहेत. या रॅलीत 30 लाख लोक सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे. 


आज, 31 जानेवारीला व्हर्च्युअल रॅलीने पंतप्रधान मोदींच्या सभांची सुरुवात होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या पाच जिल्ह्यांना पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. पश्चिम यूपीमध्ये ही ही महारॅली होणार आहे. या वेस्टर्न यूपीमध्ये शेतकरी आंदोलन प्रभावी होतं. त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार  याची उत्सुकता लागून आहे. 


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका सात टप्प्यात पार पडणार आहे आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार असून सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 7 मार्चला होणार आहे. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.


पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीची खासियत काय


5 जिल्ह्यांच्या 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यक्रम 
98 ठिकाणांवर 49000 लोकं पाहणार व्हर्चुअल रॅलीचं प्रसारण
7878 बूथवर, बूथ अध्यक्ष, पन्ना प्रमुख आणि नागरिक टिव्ही स्क्रिनवर पाहणार प्रसारण 
30 लाख स्मार्टफोन धारकांना देखील पाठवली आहे पंतप्रधानांच्या रॅलीची लिंक 
आग्र्याहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर लखनौवरुन उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा सहभागी होणार



हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha