एक्स्प्लोर

सभा नसताना पळापळ, रिकाम्या लोकलने उलटा प्रवास, पार्थ पवार पुन्हा ट्रोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार स्टंटबाजीमुळे सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल झाले आहेत.

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार यांची पनवेलमध्ये स्टंटबाजी पाहायला मिळाली आहे. काल बुधवारी रात्री पनवेलमधील मोहल्ला परिसरात पार्थ पवार प्रचारासाठी येणार होते. यावेळी ते मुस्लिम मोहल्ल्यातील नागरिकांची भेट घेणार होते. पनवेल मध्ये सभेसाठी जायला  उशीर होत असल्याने पार्थ पवार यांनी चक्क पळत हा परिसर गाठल्याच सांगण्यात  येत आहे. VIDEO | पार्थ पवारांना ट्राफिकचा फटका, गाडी सोडून पळापळ | पनवेल | एबीपी माझा पार्थ पवार धावतानाचा व्हिडीओ पनवेलमध्ये वाऱ्यासारखा पसरला. त्यामुळे आता पुन्हा एकदा पार्थ पवार सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार पळत सभा ठिकाणी जात आहेत असा आशयाचा मेसेज व्हिडीओसोबत पार्थ पवारच्या पीआर टीमकडून वायरल करण्यात येत आहे. मात्र मोहल्ला परिसरात पार्थ पवार यांची कुठलीही सभा नसल्याचं समोर आले आहे. त्याच बरोबर वाहतूक कोंडी झाली नसल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे हा निवडणूक पूर्व स्टंट आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. VIDEO | पार्थ पवारांच चौकात गाजलेलं भाषण | पिंपरी चिंचवड | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा या स्टंटबाजीमुळे सोशल मीडियावर पार्थ यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येतं असून निवडणुकीपर्यंत असे अनेक स्टंट पाहायला मिळतील अशी टीका सोशल मीडियावर होताना दिसत आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काल बुधवारीच सकाळी पार्थ पवार यांनी सीएसएमटीवरुन पनवेल असा लोकलने प्रवास केला होता. चाकरमानी सकाळच्या वेळेस पनवेलवरुन सीएसएमटीकडे मोठ्या प्रमाणात जात असतात. डब्बा गर्दीने भरलेला असतो. मात्र पार्थ यांनी सकाळच्या वेळेस लोकलमधून उलटा रेल्वे प्रवास करुन प्रवाशांच्या समस्या काय जाणून घेतल्या यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

'पार्थ पवार लंबी रेस का घोडा है... याद रखना', नितेश राणेंकडून पाठराखण

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget