Parbhani District Vidhan Sabha Election 2024 :: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वातावरण आहे. या निवडणुकीत मराठवाड्यातील परभणी या मतदारसंघाची सगळीकडे चर्चा होत आहे. कारण या जिल्ह्यातील मतदारसंघांत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ही निवडणूक कोणत्याही स्थितीत जिंकण्यासाठी येथे उमेदवारांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024 Result) या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्यात लढत झाली होती. येथे संजय दाधव यांनी जानकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. असे असताना आता या जिल्ह्यात विधासनसभा निवडणुकीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महायुती उमेदवार | महाविकास आघाडी | वंचित/अपक्ष/ इतर | विजयी उमेदवार |
1 |
परभणी |
आनंद भरोसे (शिवसेना- शिंदे गट) | राहुल पाटील (शिवसेना- ठाकरे गट) | ||
2 | जिंतूर | मेघना बोर्डीकर (भाजपा) | विजय भांबळे (राष्ट्रवादी- पवार गट) | सुरेश नागरे (वंचित) | |
3 | पाथरी | राजेश विटेकर-राष्ट्रवादी (अजित पवार गट) | सुरेश वरपूडकर (काँग्रेस) | बाबाजानी दुर्रानी (अपक्ष), सईद खान (रासप), माधवराव फड (अपक्ष, भाजपाचे नेते मोहन फड यांचे वडील) | |
4 | गंगाखेड | रत्नाकर गुट्टे (रासप, महायुतीचा पाठिंबा) | विशाल कदम-शिवसेना(ठाकरे गट) | घनदाटमामा (वंचित) |
परभणीत एकूण चार मतदारसंघ
परभणी जिल्ह्यात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. परभणी, पाथरी, गंगाखेड आणि जिंतूर अशी या मतदारसंघांची नावे आहेत. या चारही मतदारसंघांत एकूण 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात आहेत.
परभणी विधानसभा मतदारसंघ
या मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते राहुल पाटील हे महाविकास आघाडीकडून निवणुकीच्या मैदानात आहेत. राहुल पाटील हे येथील विद्यमान आमदार आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने येथून आनंद भरोसे यांना तिकीट दिलेले आहे. ते महायुतीचे उमेदवार आहेत. म्हणजेच येथे भरोसे विरुद्ध पाटील अशी लढत होणार आहे. येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झालेला आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघ
या मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाचे नेते विजय भांबळे हे उभे आहेत. तर महायुतीकडून भाजपाच्या उमेदवार मेघना बोर्डीकर या येथून निवडणूक लढवत आहेत. येथे वंचितने सुरेश नागरे यांना तिकीट दिलेलं आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघ
येथे राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे नेते राजेश विटेकर हे महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश वरपुडकर हे निवडणूक लढवत आहेत. येथे शरद पवार यांच्या पक्षाचे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी बंडखोरी केली आहे. ते येथे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. सोबतच शिंदे गटाचे नेते सईद खान हे रासपच्या तिकिटावर उभे आहेत. भाजपाचे माजी आमदार मोहन फड यांचे वडील माधवराव फड हेदेखील येथून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ
या मतदारसंघात रासपचे नेते रत्नाकर गुट्टे हे उभे आहेत. त्यांना महायुतीचा पाठिंबा आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते विशाल कदम हे महाविकास आघआडीचे उमेदवार आहेत. येथे महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. माजी आमदार घनदाटमामा हे वंचितकडून निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा :
Parbhani Assembly Election : परभणीत नेमकी कोणाची ताकद, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?