Ratnagiri District Vidhan Sabha Election 2024 : कोकणातील प्रमुख आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे रत्नागिरी. तसं म्हटलं तर राजकीयदृष्ट्या शांत, पण अधिक उलथापालथी होत असलेला हा जिल्हा. शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर झालेली पहिला विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024 Result) रत्नागिरीसाठी महत्त्वाची होती.
रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व 5 जागा या शिवसेनेच्याच निवडून आल्या होत्या. मात्र यंदा शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीत ठाकरे गट वर्चस्व प्रस्थापित करणार की शिंदे गट? याकडे सर्वाचंच लक्ष लागलं होतं. यानंतर विधानसबा निवडणूक 2024 चा बहुप्रतिक्षित निकाल लागला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचा डंका
शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेने रत्नागिरीचा गड राखला आहे. 5 पैकी 3 जागांवर शिंदेंचे उमेदवार निवडून आले आहेत, तर एका जागेवर ठाकरे गटाचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) निवडून आले आहेत. तर चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शेखर निकम (Shekhar Nikam) यांनी बाजी मारली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महायुती उमदेवार | महाविकास आघाडी | वंचित/अपक्ष/इतर | विजयी उमेदवार |
1 | रत्नागिरी | उदय सामंत (शिवसेना शिंदे गट) | बाळ माने (शिवसेना ठाकरे गट) | उदय सामंत (शिवसेना शिंदे गट) | |
2 | राजापूर | किरण सामंत (शिवसेना शिंदे गट) | राजन साळवी (शिवसेना ठाकरे गट) | अविनाश लाड (अपक्ष) | किरण सामंत (शिवसेना शिंदे गट) |
3 | गुहागर | राजेश बेंडल (शिवसेना शिंदे गट) | भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट) | प्रमोद गांधी (मनसे) | भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट) |
4 | दापोली | योगेश कदम (शिवसेना शिंदे गट) | संजय कदम (शिवसेना ठाकरे गट) | योगेश कदम (शिवसेना शिंदे गट) | |
5 | चिपळूण | शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी) | प्रशांत यादव (शरद पवार गट) | शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी) |
रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
1. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ
उदय सामंत (शिवसेना)
बाळ माने (उबाठा)
विजयी : उदय सामंत (शिवसेना शिंदे गट)
2. राजापूर विधानसभा मतदारसंघ
राजन साळवी (उबाठा)
किरण सामंत (शिवसेना)
अविनाश लाड (अपक्ष)
विजयी : किरण सामंत (शिवसेना शिंदे गट)
3. गुहागर विधानसभा मतदारसंघ
भास्कर जाधव (उबाठा)
राजेश बेंडल (शिंदे गट)
प्रमोद गांधी (मनसे)
विजयी : भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट)
4. दापोली विधानसभा मतदारसंघ
योगेश कदम (शिंदे गट)
संजय कदम (उध्दव गट)
संतोष अबगुले (मनसे)
विजयी : योगेश कदम (शिवसेना शिंदे गट)
5. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ
शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)
प्रशांत यादव (शरद पवार गट)
विजयी : शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)