चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात आयोजित पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत गोंधळ झाला. भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी ही सभा सुरू होती, तेव्हा हा प्रकार घडला. पिंपरी चिंचवड शहर कसं स्मार्ट होतंय असं पंकजा मुंडे सांगत असताना जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. घोषणाबाजी करणारे घर बचाव कृती समितीचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात प्रस्तावित रिंग रोड मार्गात अनेकांची बेकायदा घरं आहेत. त्यावर पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण त्यावर हातोडा चालवणार आहेत. ती घरं नियमित करावीत अशी बाधितांची भाजपकडे मागणी आहे. घर बचाव कृती समिती संघटना यासाठी वेगवेगळे आंदोलन करते. त्याच आंदोलनानंतर भाजपने योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन दिलं होतं. ते अद्याप पूर्ण न झाल्याने कृती समितीच्या सदस्यांनी आज पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ घातला. हे सरकार फसवं आहे, आमच्या घरं नियमित केली नाहीत. अशा आशयाच्या त्यांनी घोषणा दिल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांनी दिली. या सर्वांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पंकजा मुंडेंच्या सभेतील गोंधळात आता भाजप कनेक्शन समोर आलं आहे. भाजपचे स्वीकृत सदस्य संदीप गाडे यांच्या भगिणी सुनीता फुले ह्या देखील घोषणाबाजी करत होत्या. यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. वाकड पोलिसांनी तीन महिला आणि तीन पुरुष अशा सहा जणांना ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती समोर आली. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. गाडे हे स्वीकृत सदस्य आहेत.
दरम्यान, मराठवाड्यातून या भागात मोठा वर्ग आला आहे. त्यांनी भाजपलाच मतं द्यावीत, असं आवाहन यावेळी मुंडे यांनी केलं.
बिहार निवडणूक निकाल 2025
(Source: ECI | ABP NEWS)
चिंचवडमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ, घर बचाव कृती समितीचं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम Updated at: 13 Oct 2019 01:58 PM (IST)