रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातून संजय कदम या नावाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने दापोली विधानसभा मतदारसंघ राज्यात चांगलाच चर्चेत आला आहे. रायगड जिल्ह्यातील शेकापचा फार्म्युला यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. दापोली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार संजय कदम आणि शिवसेनेचे योगेश कदम हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांना शह देण्यासाठी विरोधकांनी त्यांच्याच नावाचे तीन संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. मत विभाजन करण्यासाठी विरोधकांकडून संजय दगडू कदम, संजय सीताराम कदम, संजय संभाजी कदम या एकाच नावाचे तीन अपक्ष उमेदवार उभे करून राष्ट्रवादीचे संजय वसंत कदम यांना शह देण्यासाठी विरोधकांनी ही खेळी खेळली आहे. मात्र ही खेळी किती यशस्वी होते येणाऱ्या मतमोजणी नंतरच कळू शकेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात दुसऱ्यांदा उभे आहेत. त्यांना शह देण्यासाठी विरोधकांनी त्यांच्याच नावाचे तीन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता आपण मतदारसंघातील विकास करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे सांगण्यात आले. संजय दगडू कदम, संजय सीताराम कदम, संजय संभाजी कदम हे अपक्ष उमेदवार ग्रामीण भागातले शेतकरी आहेत. हे तिघे निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने संजय कदम नावाचा त्यांना कितपत फायदा होतो, हेच पहावे लागेल.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची ही खेळी यशस्वी झाली होती. डमी सुनील तटकरेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. 2019 च्या निवडणुकीमध्ये तोच फार्म्युला विरोधकांनी अवलंबला होता परंतु त्यांना यश आले नव्हते.
दापोली विधानसभा मतदारसंघातून विरोधकांनी संजय कदम नावाचे 3 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत मात्र मतदार असणार नाहीत ग्रामीण भागातला मतदार नाव बघून नाही तर पक्षाचे चिन्ह बघून मतदान करतात त्यामुळे आपल्या विरोधात विरोधकांनी खेळलेली खेळी सक्सेस होणार नाही आपला घड्याळ चिन्ह लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचला आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र उमेदवार योगेश कदम पंचेचाळीस हजार मतांनी निवडून येईन असा दावा करत आहेत.
दापोलीमध्ये एकाच नावाचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Oct 2019 11:42 AM (IST)
2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची ही खेळी यशस्वी झाली होती. डमी सुनील तटकरेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. 2019 च्या निवडणुकीमध्ये तोच फार्म्युला विरोधकांनी अवलंबला होता परंतु त्यांना यश आले नव्हते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -