एक्स्प्लोर
Advertisement
...तर शरद पवारांना दिल्लीत राहण्यासाठी घर शोधावे लागेल, चंद्रकांत पाटलांची टीका
सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीत निंबाळकर यांच्या प्रचाराचा भव्य मेळावा शनिवारी घेण्यात आला होता. यासाठी चंद्रकांत पाटील यांचेसह सहकार मंत्री सुभाष देशमुख , कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रणजितसिंह मोहिते पाटील , आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.
पंढरपूर : शरद पवार चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करत आहेत. या चार जागा भाजपने जिंकल्यावर पवारांना दिल्लीत राहायला घर शोधावे लागेल, असा घणाघात महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीत निंबाळकर यांच्या प्रचाराचा भव्य मेळावा शनिवारी घेण्यात आला होता. यासाठी चंद्रकांत पाटील यांचेसह सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.
शरद पवार यांचा जीव बारामती , माढा , कोल्हापूर आणि सातारा या चार मतदारसंघमध्ये असून यंदा हे चारी मतदारसंघ भाजप जिंकेल असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. तसेच बारामती धोक्यात असल्याचा इशाराही त्यांनी दिला. शरद पवार या चार मतदारसंघांच्या जीवावर दिल्लीत राजकारण करतात. मात्र या चार जागा भाजपने जिंकल्यांवर त्यांना दिल्लीत राहण्यासाठी घर शोधावे लागेल असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets