एक्स्प्लोर

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजप दावा करणार? बाळासाहेबांची शिवसेना आणि जिजाऊ संघटना पाठिंबा देण्याची शक्यता

Palghar : राज्यात राजकीय उलथापालक झाल्यानंतर सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत.

Palghar ZP Latest News Update : राज्यात राजकीय उलथापालक झाल्यानंतर सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही अमुलाग्र बदल पाहायला मिळतो. राज्यात भाजप आणि शिंदे गटाची बाळासाहेब शिवसेना यांचा सरकार स्थापन झालं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही या दोन्ही गटांच्या शिवसेना सदस्यांमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याने तहकूब झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार सात नोव्हेंबरला होणार असून या सभेत शिवसेना सदस्यांची राजकीय भूमिका स्पष्ट होणार आहे. त्यामुळे येत्या दहा-बारा दिवसात होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे. अध्यक्षपद आपल्याकडेच राखण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र राहणार की शिंदे गटाची बाळासाहेबांची शिवसेना भाजपला पाठिंबा देऊन भाजपचा अध्यक्ष निवडून आणणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तर या सर्व राजकारणात स्थानिक पातळीवर पालघर जिल्ह्यात अग्रेसर असलेली जिजाऊ संघटना काय भूमिका घेते याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या 18 ऑगस्टच्या सभेत मे महिन्यात झालेल्या सभेचे इतिवृत्त लिखाणात झालेल्या चुकांबाबत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तर मुंबई महानगर क्षेत्रांतर्गत विकास कामांबाबतचा विषय सर्वसाधारण सभेत पुढे ठेवताना तांत्रिक मुद्द्यांवर इतर विकास कामांमध्ये सर्व सभासदांना समान वाटप झाले नसल्याने आरोप – प्रत्यारोप होऊन गोंधळ झाला होता. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेकडे असताना आरोप करून आक्षेप घेणारे शिवसेनेचे गटनेते तसेच शिवसेनेचे काही सदस्य आक्रमक राहिले होते. याला भाजपाच्या व बहुजन विकास आघाडीच्या काही सदस्यांनी साथ दिली होती. 18 ऑगस्टच्या सभेतील 14 विषयांपैकी मागील सभेचे इतिवृत्त व आरोग्य विषय काही मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर भोजनानंतर ही सभा तहकूब करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेनेचे काही सदस्य यांनी शिंदे गटात (बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश केला असून 20 सदस्य असणाऱ्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास समसमान विभागणी झाली आहे. शिवाय राज्यात शिंदे गट व भाजप एकत्र असल्याने तहकूब झालेली सर्वसाधारण सभा पुन्हा चालवताना राज्यातील सत्तास्थानी असलेल्या दोन पक्षांचे सदस्य जिल्हा परिषदेत कशी भूमिका घेतात हे पुढील राजकीय डावपेचांच्या दृटीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा वाढविलेला कार्यकाळ 17 नोव्हेंबरला संपत असून यापूर्वी या पदांसाठी निवडणूक होणे अपेक्षित आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषदेमधील संख्याबळ २० असले तरी त्यापैकी फक्त 15 सदस्यांचा गट नोंदणीकृत राहिलेला आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यास भाजपसोबत युती करून सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेचे सदस्य एकसंघ राहिल्यास राष्ट्रवादी व इतर मित्र पक्षांसोबत जिल्हा परिषदेतील सत्ता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादीमध्ये कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. या सर्वसाधारण बैठकीच्या नियोजनात सर्व सदस्यांना एकत्र करण्याचे छुपे उद्दिष्ट असून त्यानंतर काही सदस्यांना निवडणुकीपूर्वी सहलीसाठी बाहेरगावी घेऊन जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अध्यक्षपदावर भाजपाचा दावा 
शिवसेनेत फूट पडल्याने शिंदे गटाची संख्या कमी होऊन असून १३ सदस्यांचा गट असणाऱ्या भाजपाने अध्यक्षपदावर दावा केला असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. सत्तेत बसण्यासाठी भाजपा शिवसेनेच्या शिंदे गटाचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस किंवा बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा घेईल अशी शक्यता आहे.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget