एक्स्प्लोर

पालघर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला बहुमत, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

पालघर नगरपरिषदेवर शिवसेना-भाजप-रिपाइं युतीचा झेंडा फडकला, मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे विराजमान होणार आहेत.

पालघर : पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालं, मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार विराजमान होणार आहे. थेट जनतेतून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. पालघर नगरपरिषदेच्या 14 प्रभागांमधील 28 जागांचे निकाल आज जाहीर करण्यात आले. भाजप-शिवसेना-रिपाइं युतीने बहुमत मिळवत 21 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीला 2, तर अपक्षांना 5 जागा जिंकता आल्या. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे राष्ट्रवादीतून आलेल्या श्वेता मकरंद पाटील, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला केदार काळे आणि शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार अंजली पाटील रिंगणात होत्या. राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीच्या उज्ज्वला काळे यांनी 1069 मतांनी विजय मिळवला. महायुती 21 महाआघाडी 2 अपक्ष 5 पालघर नगरपरिषदेच्या 14 प्रभागांमधील 28 जागांसह एका नगराध्यक्षपदासाठी काल मतदान झालं. दिवसभरात अंदाजे 67 टक्के मतदान झाल्याचं जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आलं. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगरपरिषदेची निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले होते. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना रंगला. पक्षीय बलाबल शिवसेना 14 भाजप 7 राष्ट्रवादी 2 अपक्ष 5 विजयी उमेदवार यादी पालघर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला बहुमत, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी 30 उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असून त्यापैकी 22 जण बंडखोर उमेदवार होते. पालघर नगरपरिषदेवर याआधी शिवसेनेची सत्ता होती, मात्र आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आयात उमेदवाराला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आणि त्यांनी बंडखोर म्हणून अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला होता.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Satara : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नावाचा घोळ, प्रशांत बोंबले यांच्या नावाची नोंद 'दादा साहेबाची बॉम्बस्फोट'
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नावाचा घोळ, प्रशांत बोंबले यांच्या नावाची नोंद 'दादा साहेबाची बॉम्बस्फोट'
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Diveagar beach Tragedy: आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवेआगरची सहल ठरली काळी आठवण, आठ मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताच पालकांना हुंदका अनावर, बस आळंदीत पोहोचली
आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवेआगरची सहल ठरली काळी आठवण, आठ मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताच पालकांना हुंदका अनावर, बस आळंदीत पोहोचली
Maharashtra Live blog updates: पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, 646.58 कोटींच्या 211 मालमत्ता जप्त
Maharashtra Live blog updates: पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, 646.58 कोटींच्या 211 मालमत्ता जप्त
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नवरात्रौत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, सात जणांचा मृत्यू,18 जण जखमी
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नवरात्रौत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, सात जणांचा मृत्यू,18 जण जखमी
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Buldhana News: अंगावर विषारी केमिकल उडाल्याने कामगाराचा मृत्यू; मलकापूर औद्योगिक क्षेत्रातील बॅन्जो केम कंपनीतील धक्कादायक घटना, कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
अंगावर विषारी केमिकल उडाल्याने कामगाराचा मृत्यू; मलकापूर औद्योगिक क्षेत्रातील बॅन्जो केम कंपनीतील धक्कादायक घटना, कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Embed widget