Maharashtra Assembly Election 2024 सिंधुदुर्ग : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीतून (Maharashtra Assembly Elections 2024) माघार घेण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत माघार घेतली असली तरी मराठा समाजाने ज्याला पाडायचं आहे, त्याला पाडावं, असं त्यांनी जाहीर केलं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी केली असून ज्यांनी आरक्षणाला त्रास दिला त्याला सोडू नका, त्यांचा उभा कार्यक्रम करा, असा इशारा त्यांनी दिलाय.
दरम्यान, याच मुद्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्यावर टीका करत लक्ष्य केले आहे. मराठा आरक्षण हा विषय बाजूला ठेवून मनोज जरांगे आता 24 तास राजकारणी झालं आहेत. किंबहून ते सेटलमेंट बादशाह झाले आहेत, अशी बोचरी टीका नितेश राणेंनी केली आहे.
काँग्रेसला मत म्हणजे जिहादाला मत- नितेश राणे
2047 ला भारत देश इस्लामिक देश बनविण्यासाठी या संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांच्या मागण्या हिंदू विरोधी आहेत. अशा बोर्ड वर लवकरात लवकर बंदी घालावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. तुमच्या मागण्या पूर्ण होऊ देणार नाही. तुम्हाला काय शिक्षा द्यायची ते 23 नंतर समजेल. काँग्रेस मुस्लिम लीग ची ही बी टीम आहे. काँग्रेस हिंदू द्वेशी पक्ष आहे. काँग्रेसला मत म्हणजे जिहादाला मत, असे म्हणत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उलेमा बोर्डवर सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे जिहादी सम्राट झाले आहेत- नितेश राणे
उद्धव ठाकरेंच हिंदुत्व कोणाची चूल पेटवत नाही, ते जिहादी सम्राट झालेले आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्या तोंडातून हिंदुत्व हा शब्द निघेल तेव्हा त्यांच्या अंगावर गोमूत्र शिंपडावं लागेल. असा घणाघातही नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलाय. मुसलमानांनी अनधिकृत जागेवर घर, मंदिर बांधली तर बुलडाओझर चालणारच. हिंदू द्वेष बंद करतील ते त्यांच्या हिताचं आहे. अन्यथा त्याच मदारच्या बाजूला आवेसीला झोपवावं लागेल. असे म्हणत नितेश राणेंनी AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही निशाणा साधलाय.
सिल्वर ओकचा शकुनी मामा म्हणजे रोहित पवार
रोहित पवार यांना गृहमंत्री होण्यापूर्वी त्यांनी आधी त्यांचे घर संभाळले पाहिजे. मातोश्र मध्ये एक शकूनी मामा आणि सिल्वर ओकचा शकुनी मामा म्हणजे रोहित पवार आहेत. अशी टीका नितेश राणेंनी रोहित पवार यांच्यावर केली आहे.
हे ही वाचा