Maharashtra Assembly Election 2024 सिंधुदुर्ग : दिवाळीचा सण पार पडल्यानंतर राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापूरमधून प्रचाराचा शुभारंभ करण्याची परंपरा ही शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत कोल्हापूरमधून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत चौफेर फटकेबाजी केली.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभांचा धडाका होणार असल्याचे चित्र आहे. ठाकरेंच्या पुढील 13 दिवसात राज्यात 34 सभा होणार आहेत. मुंबई -ठाणे ते कोकण, मराठवाडा ते विदर्भ, उत्तर महाराष्ट्र ते पश्चिम महाराष्ट्रभर सभांचा धुरळा होणार असून 13 नोव्हेंबरला कणकवली, कुडाळ सावंतवाडी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. दरम्यान, याच सभेवरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत लक्ष्य केले आहे.
तर मी उद्धव ठाकरेंचे स्वागत करतो, सभेसाठी पैसेही पाठवतो-नितेश राणे
उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत सभा घ्यावी, ते सभा घेणार असतील तर मी उद्धव ठाकरेंचे स्वागत करतो, शिवाय त्यांना मी सभेसाठी पैसे पाठवतो, असे आव्हान नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. कोकणात राणे आणि सामंत यांच्या जीवावर उद्धव ठाकरे ढेकर काढायचे. यांना गाड्या आम्ही विकत घेऊन द्यायचो, तेव्हा त्यांना हे चालायचं? असा सवालही नितेश राणे यांनी केलाय.
उद्धव ठाकरेंनी आम्हाला छत्रपतींच्या प्रेमाबद्धल शिकवू नये
संजय राऊत यांची छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याची लायकी नाही. ते संजय राऊत फडणवीस साहेबांवर आरोप करत आहेत. सामनामध्ये कार्टूनच्या माध्यनातून महिलांचा अपमान करण्याचं काम सुरु आहे. मुघलांची पिलावळ महाराजांच्या स्मारकाबद्दल आम्हाला शिकवणार का? ज्याच्यामुळे अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ शकले नाही, तो असीम सरोदे कोणाचा जावई आहे? अरबी समुद्रात होणाऱ्या महाराजांच्या स्मारक बाबतची याचिका मागे घे असं असीम ला सांगा. उद्धव ठाकरे 50 लाख रुपये आमच्या मालवण मधील छत्रपतींच्या मंदिरात देणार होता, त्याचा विसर त्यांना पडला आहे का? कोल्हापूरमध्ये राजेंचा अपमान झाला, तेव्हा बंटी पाटीलला का रोखलं नाही? विशाल गडच्या वेळी हे कुठे होते? त्यामुळे जानाब उद्धव ठाकरेंनी आम्हाला छत्रपतींच्या प्रेमाबद्धल शिकवू नये, अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
आणखी वाचा
लाडकी बहीणचे पैसे 2100 रुपये करणार, दादांचा नवा वादा, राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध