News Arena India Survey On Maharashtra Assembly Election: न्यूज अरेना (News Arena India) या संस्थेचा एक निवडणूक सर्वे व्हायरल होत असून त्यामध्ये कोकण आणि मुंबईमध्ये भाजप बाजी मारणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबई आणि कोकणमध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकणार असून त्याखालोखाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार निवडून येतील. एकूण 75 मतदारसंघातील निकाल काय असेल हे या सर्वेमध्ये सांगितलं आहे.


न्यूज अरेना (News Arena India) या ट्वीटर हँडलवरुन महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या केवळ संभाव्य निकालाचं भाकित करण्यात आलेलं नाही तर राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. न्यूज अरेना या ट्विटर हँडलने गेल्या महिन्यातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अचूक भाकिताचं श्रेय घेताना त्यांच्या टाईमलाईनवर एक ट्वीट पिन केला आहे. या ट्वीटखाली एका यूजरने राजस्थान आणि महाराष्ट्रातील अंदाज विचारल्यावर 13 मे रोजी असं उत्तर दिलं होतं की राजस्थानविषयी कल्पना नाही पण महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाचा अंदाज किंवा त्याविषयी आताच काही बोलणं घाईचं होईल.


 







त्यानंतर आता फक्त महिन्याभरातच राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा निकाल कसा लागेल, याचा ट्वीटर थ्रेड प्रकाशित केला आहे.  मतदारसंघ निकालाचा अंदाज सांगताना या ट्वीटर हँडलने वेगवेगळ्या मतदारसंघातील भाकित किंवा अंदाजाचं कारणही दिलेलं आहे. 


 






न्यूज अरेनाचं (News Arena India) विभागनिहाय आणि मतदारसंघनिहाय भाकीत


मुंबईसह कोकण (Konkan Region) एकूण जागा 75  



  • भाजप (BJP) : 29-33

  • शिवसेना (ShivSena) : 11

  • शिवसेना (उद्धव ठाकरे) (ShivSena-Uddhav Thackeray) : 14-16

  • काँग्रेस (INC) : 5-6

  • राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) : 7-8

  • अपक्ष आणि इतर (OTH) : 5 


मुंबई (Mumbai) एकूण जागा 36 



  • भाजप (BJP) : 16-18

  • शिवसेना (उद्धव ठाकरे) (ShivSena-Uddhav Thackeray) : 9-10

  • शिवसेना (ShivSena)  : 2

  • राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) : 1

  • काँग्रेस (INC) : 5-6

  • अपक्ष आणि इतर (OTH) : 1


मतदारसंघनिहाय अंदाज


152. बोरिवली (Borivali) : भाजप (गेल्या चार दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला)
153. दहीसर (Dahisar) : भाजप
154. मागाठणे (Magathane) : शिवसेना (शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे हा मतदारसंघ राखतील कारण त्यांचे हक्काचे मतदार, तसंच या मतदारसंघातील तब्बल 30 टक्के गुजराती भाषक आणि उत्तर भारतीयांचा पाठिंबा)
155. मुलुंड (Mulund) : भाजप (विद्यमान आमदार मिहिर कोटेचा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद) 
156. विक्रोळी (Vikhroli) : शिवसेना (उद्धव ठाकरे) 
157. भांडुप पश्चिम (Bhandup West) : शिवसेना (उद्धव ठाकरे)
158. जोगेश्वरी पूर्व (Jogeshwari East)  : शिवसेना (उद्धव ठाकरे) (विक्रोळी, भांडुप आणि जोगेश्वरी मतदारसंघात मराठी आणि मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे, त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना होईल)
159. दिंडोशी (Dindoshi) : भाजप (या मतदारसंघात भाजपसाठी अनुकूल वातावरण) 
160. कांदिवली पूर्व (Kandivali East) : भाजप
161. चारकोप (Charkop) : (भाजप गुजरातीबहुल मतदारसंघ)
162. गोरेगाव (Goregaon) : भाजप  
163. मालाड पश्चिम (Malad West) : 50:50
164. वर्सोवा (Versova) : शिवसेना (उद्धव ठाकरे)
165. अंधेरी पश्चिम (Andheri West) : भाजप (भाजपसाठी अनुकूल आणि ध्रुवीकरण)
166. अंधेरी पूर्व (Andheri East) : शिवसेना (उद्धव ठाकरे)
167. विलेपार्ले (Vile Parle) : भाजप 
168. चांदिवली (Chandivali) : काँग्रेस
169. घाटकोपर पश्चिम (Ghatkopar West) : भाजप 
170. घाटकोपर पूर्व (Ghatkopar East) : भाजप 
171. मानखुर्द शिवाजीनगर (Mankhurd Shivaji Nagar) : समाजवादी पार्टी 
172. अणुशक्तीनगर (Anushakti Nagar) : राष्ट्रवादी काँग्रेस 
173. चेंबूर (Chembur) : काँग्रेस
174. कुर्ला (Kurla) : शिवसेना (उद्धव ठाकरे)
175. कलिना (Kalina) : अनिश्चित (Tossup)
176. वांदरे पूर्व (Bandra East) : काँग्रेस
177. वांदरे पश्चिम (Bandra West) : भाजप  
178. धारावी (Dharavi-SC) : काँग्रेस 
179. सायन कोळीवाडा (Sion Koliwada) : भाजप (बलाढ्य उमेदवार)
180. वडाळा (Wadala) : भाजप (तब्बल सहावेळा जिंकलेला बलाढ्य उमेदवार)
181. माहीम (Mahim) : शिवसेना (उद्धव ठाकरे) 
182. वरळी (Worli) : शिवसेना (उद्धव ठाकरे)
183. शिवडी (Shivadi) : शिवसेना (उद्धव ठाकरे)
184. भायखळा (Byculla) : शिवसेना 
185. मलाबार हिल (Malabar Hill) : भाजप 
186. मुंबादेवी (Mumbadevi) : काँग्रेस 
187. कुलाबा (Colaba) : भाजप  (अटीतटीची लढत) 


ठाणे (Thane) एकूण जागा 18)
भाजप (BJP) : 8-10
शिवसेना (एकनाथ शिंदे) : 5
शिवसेना (उद्धव ठाकरे) : 1-2
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) : 2-3


134. भिवंडी ग्रामीण (Bhiwandi Rural) (ST) : शिवसेना (उद्धव ठाकरे)
135. शहापूर (Shahapur) (ST) : राष्ट्रवादी काँग्रेस 
136. भिवंडी पश्चिम (Bhiwandi West)  : अनिश्चित 
137. भिवंडी पूर्व (Bhiwandi East) : भाजप 
138. कल्याण पूर्व (Kalyan West) : शिवसेना 
139. मुरबाड (Murbad) : भाजप (बलाढ्य उमेदवार) 
140. अंबरनाथ (Ambernath) (SC) : शिवसेना
141. उल्हासनगर (Ulhasnagar) : 50:50
142. कल्याण पूर्व (Kalyan East) : भाजप 
143. डोंबिवली (Dombivali) : भाजप (उमेदवाराची लोकप्रियता)
144. कल्याण ग्रामीण (Kalyan Rural) : शिवसेना
145. मिरा भाईंदर (Mira Bhayandar): भाजप
146. ओवळा माजिवडा (Ovala Majiwada) : शिवसेना 
147. कोपरी पाचपाखाडी (Kopri Pachpakhadi) : शिवसेना 
148. मुंब्रा (Mumbra) : राष्ट्रवादी काँग्रेस 
149. बेलापूर (Belapur) : भाजप  
150. ऐरोली (Airoli) : भाजप 
151. ठाणे (Thane) : भाजप 


रायगड (Raigad) एकूण जागा 7
भाजप (BJP) : 2, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) : 2, शिवसेना (उद्धव ठाकरे) (SSUBT) : 2, इतर (OTH) : 1


188. पनवेल (Panvel) : भाजप (बलाढ्य उमेदवार) 
189. कर्जत (Karjat) : राष्ट्रवादी काँग्रेस 
190. उरण (Uran) : भाजप 
191. पेण (Pen) : शेकाप (PWPI)
192. अलीबाग (Alibag) : शिवसेना (उद्धव ठाकरे)
193. श्रीवर्धन (Shrivardhan) : राष्ट्रवादी काँग्रेस 
194. महाड (Mahad) : शिवसेना (उद्धव ठाकरे)


रत्नागिरी (Ratnagiri) - एकूण जागा 5


शिवसेना (एकनाथ शिंदे) : 2, शिवसेना (उद्धव ठाकरे) : 2, राष्ट्रवादी काँग्रेस : 1


263. दापोली (Dapoli) : शिवसेना
264. गुहागर (Guhagar) : शिवसेना (उद्धव ठाकरे)
265. चिपळूण (Chiplun) : राष्ट्रवादी काँग्रेस 
266. रत्नागिरी (Ratnagiri) : शिवसेना
267. राजापूर (Rajapur) : शिवसेना (उद्धव ठाकरे)


सिंधुदुर्ग  (Sindhudurg) - एकूण जागा - 3
भाजप : 2, शिवसेना  : 1


268. कणकवली (Kankavli) : भाजप
269. कुडाळ (Kudal) : भाजप 
270. सावंतवाडी (Sawantwadi) : शिवसेना 


पालघर (Palghar) - एकूण जागा 6
भाजप  : 1, शिवसेना : 1 , राष्ट्रवादी काँग्रेस : 1, इतर : 3


128. डहाणू (Dahanu) : डावी आघाडी (LEFT)
129. विक्रमगड (Vikramgad) : राष्ट्रवादी काँग्रेस 
130. पालघर (Palghar) : शिवसेना 
131. बोईसर (Boisar) : भाजप 
132. नालासोपारा (Nalasopara) : बहुजन विकास आघाडी
133. वसई (Vasai) : बहुजन विकास आघाडी (BVA)



ही बातमी वाचा: