Samsung Galaxy : सध्या वेगवेगळ्या स्मार्टफोन कंपन्यांकडून ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जबरदस्त सूट दिली जात आहे. अशातच सॅमसंग या आघाडीच्या स्मार्टफोन कंपनीने त्यांच्या दोन स्मार्टफोनवर सूट दिली आहे. सध्या सॅमसंग गॅलेक्सी ए 23 5 जी (Samsung Galaxy A23 5G)  या स्मार्टफोनवर सुट देण्यात आहे. ही सूट अमेझॉन (Amazon)या ऑनलाईन वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटचा स्मार्टफोन 23,999 रूपयांत विकत मिळणार आहे.  या स्मार्टफोनची मूळ किंमत 30,990 रूपये इतकी आहे. सध्या कंपनीने 23 टक्के सूट देऊन विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. याशिवाय तुम्ही बँक ऑफर आणि स्मार्टफोन एक्सचेंज ऑफर मिळवू शकता. तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला, तर तुम्हाला 22,250 रूपयांपर्यंत सूट मिळू शकते. यामुळे तुमच्या पैशाची बचत होणार आहे. 


Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन्स 


Samsung Galaxy A23 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले  आणि  120Hz चा रिफ्रेश रेट मिळणार आहे.
Samsung Galaxy A23 5G फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. 
Samsung Galaxy A23 5G फोनमध्ये 8 जीबी  रॅम आणि  128 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे.
Samsung Galaxy A23 5G मध्ये 5,000mAh इतकी बॅटरी क्षमता आहे. ही बॅटरी 25 वॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्टेड आहे.
Samsung Galaxy A23 5G मध्ये 50 मेघापिक्सल क्वाड रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करून दिला आहे. 
Samsung Galaxy A23 5G मध्ये सुरक्षिततेची खबरदारी म्हणून फिंगरप्रिंट स्कॅनिंगची सुविधा देण्यात आली आहे.


SAMSUNG Galaxy A34 5G वर सूट 


सॅमसंगचा दुसरा स्मार्टफोन SAMSUNG Galaxy A34 5G वरही स्वस्त किमती मिळत आहे. या स्मार्टफोन 16 टक्के इतकी  सूट देण्यात येत आहे. सध्या हा स्मार्टफोन  32,999 रूपयांना विकत मिळत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 39,499 रूपये इतकी आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. SAMSUNG Galaxy A34 5G Awesome Graphite,8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. याशिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्हाला आणखीन सूट मिळू शकते. यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँक क्रेडि कार्ड आणि  सॅमसंग अॅक्सिस क्रेडिट कार्डवरून खरेदी करावी लागेल. ही खरेदी केल्यानंतरच तुम्हाला अतिरिक्त सूट मिळू शकते.  



SAMSUNG Galaxy A34 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स  


SAMSUNG Galaxy A34 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले  आणि  120Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे.
SAMSUNG Galaxy A34 5G मध्ये  48MP + 8MP + 5MP  रियर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
SAMSUNG Galaxy A34 5G मध्ये 2.6 मेगाहर्ट्जचा ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
SAMSUNG Galaxy A34 5G मध्ये  8 जीबी रॅम आणि  256 जीबी स्टोरेज उपलब्ध करून दिला आहे.
SAMSUNG Galaxy A34 5G मध्ये 5,000mAh इतकी बॅटरी क्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
Samsung Galaxy A23 5G मध्ये सुरक्षिततेची खबरदारी म्हणून फिंगरप्रिंट आणि प्रॉक्सिमिटी सेंसरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड स्मार्टफोन कॅटेगिरीतील आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :


Samsung Galaxy F54 5G भारतात 'या' दिवशी होणार लाँच, 108MP कॅमेऱ्यासह दमदार फिचर्स, प्री-बुकींगला सुरुवात