एक्स्प्लोर

निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अंगलट, प्रकाश आंबेडकरांविरोधात गुन्हा

निवडणूक आयोगाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी काल (बुधवारी) यवतमाळच्या दिग्रसमध्ये झालेल्या जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, त्यानंतर त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुंबई/यवतमाळ : निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना चांगलंच भोवलं आहे. आंबेडकरांविरोधात यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिग्रज पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. "पुलवामाच्या घटनेवर काही बोललं, की निवडणूक आयोग बंदी लावतं. ही यंत्रणा भाजपच्या हातातील बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या, यांना दोन दिवस तुरुंगाची हवा खायला पाठवल्याशिवाय राहणार नाही" असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती निवडणूक आयोगाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी काल (बुधवारी) यवतमाळच्या दिग्रसमध्ये झालेल्या जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्याविरुद्ध दिग्रस पोलिसात कलम 503, 506, 189 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
सत्तेत येऊ द्या, निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू : आंबेडकर
यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्रसमधील लक्ष्मणराव बनगीनवार मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली. दोन्ही पक्षांना सत्तेपासून दूर ठेवून डाव्या आणि वंचित आघाडीच्या हाती सत्ता द्या, असं आवाहन त्यांनी केलं. VIDEO | सत्ता आल्यास निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू : प्रकाश आंबेडकर | एबीपी माझा सत्तेत आल्यास केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणाची  जबाबदारी शासनाची असेल आाणि आरएसएस जेलमध्ये असेल, असंही आंबेडकर म्हणाले होते. कॉंग्रेसचं नेतृत्त्व मोदींच्या राजकारणाचा बळी ठरत असून पक्षातील गांधी विचारधारा असलेल्या नेत्यांची गळचेपी होत आहे. तर पुलवामाची घटना ही 'मॅच फिक्सिंग' असून यावर काही बोललं की निवडणूक आयोग बंदी घालतं. ही यंत्रणा भाजपच्या हातचे बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या, यांनाही जेलची हवा खायला पाठवू, असा इशाराही आंबेडकरांनी दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
Embed widget