एक्स्प्लोर

काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार, आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, कालिदास कोळंबकरांचा राजीनामा

शिवेंद्रराजे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मागील तीन-चार दिवसांत या घडामोडींना वेग आला होता. अखेर त्यांनी आज (30 जुलै) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आज मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि वैभव पिचड तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यातील जावळी मतदारसंघातील आमदार आहेत. वैभव पिचड अहमदनगर येथील अकोले मतदारसंघातील आमदार आहेत. तर कालिदास कोळंबकर मुंबईतील वडाळा मतदारसंघातील आमदार आहेत. तिन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितलं. शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी) शिवेंद्रराजे 2004 पासून सातारा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. शिवेंद्रराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्यानंतर ते बाहेर पडणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न खुद्द शरद पवारांनी केले होते. मात्र वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी अखेर शिवेंद्रराजे यांनी आज राजीनामा दिला आहे. च्यासोबत बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बॅंकेचे संचालकही भाजपमध्ये जाणार आहेत. वैभव पिचड (राष्ट्रवादी) राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक मधुकर पिचड यांचे पुत्र आणि अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. गेल्या पाच वर्षांपासून अकोले तालुक्याचा विकास रखडला असून रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक विकासाच्या योजना विरोधी पक्षात असल्यानं पूर्ण होत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला यश मिळालं आणि आगामी विधानसभेत हेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, अशी भावना कार्यकर्त्यांची झाली असून तालुक्याचा विकास व्हावा ही जनतेची भावना ओळखून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं आमदार वैभव पिचड यांनी सांगितलं होतं. कालिदास कोळंबकर (काँग्रेस)  कालिदास कोळंबकर यांनी कालच आपला राजीनामा प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त केला आहे. 'मी काँग्रेसवर नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं म्हणून मला पक्षाने बाहेर केलं' असं म्हणत कालिदास कोळंबकरांनी मागेच भाजप प्रवेशाची घोषणा केली होती. कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत. उदयनराजेंचं निवडणुकीनंतरचं वागणं बदललं, आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Satara Accident News: धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Accident News: धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Embed widget