एक्स्प्लोर

आधी लोकसभा जिंकू, मग विधानसभेची चर्चा, इंदापूरच्या जागेवरुन अजित पवारांनी सुनावलं

आम्ही लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करतोय. आधी लोकसभा जिंकायचीय आणि नंतर विधानसभेबाबत चर्चा करु अशी भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली. त्यामुळे इंदापूरच्या विधानसभेच्या जागेचा तिढा वाढणार असल्याची शक्यता आहे.

इंदापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय झाला, तरच आघाडीच्या उमेदवारांचं काम करु अशी भूमिका इंदापूरमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली होती. मात्र, आधी लोकसभा जिंकायची आहे, मग विधानसभेबाबत चर्चा करु, असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना शांत बसवलं. राज्यात लोकसभेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे. अशातच लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही आघाडीचं काम करणार नाही अशी भूमिका काही दिवसांपूर्वी इंदापूरमधील कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात घेतली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसमोरच नेत्यांनी नाराजीचा सूर लावला होता. VIDEO | शरद पवारांच्या हस्ते गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचं अनावरण | एबीपी माझा लोकसभेला आम्ही आघाडीचं काम करतो, मात्र त्यानंतर येणाऱ्या विधानसभेला नेहमी आमचा घात केला जातो, असा आरोप राष्ट्रवादीवर केला होता. त्यामुळे लोकसभेची आघाडी होण्याअगोदर इंदापूर विधानसभेच्या जागेचा निर्णय करा, मगच आम्ही आघाडीच्या उमेदवाराचे काम करु असं मत त्यांनी मांडलं होतं. या भूमिकेवर राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार, याकडे इंदापूरसह अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं असता इंदापूर विधानसभेचा प्रश्न आला कुठे? असा सवाल त्यांनीच उपस्थित केला. आम्ही लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करतोय. आधी लोकसभा जिंकायचीय आणि नंतर विधानसभेबाबत चर्चा करु अशी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे इंदापूरच्या विधानसभेच्या जागेचा तिढा वाढणार असल्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
Ashish Shelar : एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया, शेलार म्हणाले, उदय सामंतांचा गैरसमज दूर करु
एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
Embed widget