एक्स्प्लोर

हिंमत असेल तर सांगा, तुम्ही म्हणाल तिथं येईन, उदयनराजेंना आव्हान देताना नरेंद्र पाटलांची जीभ घसरली

यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, माझ्यावर दोनदा प्राणघातक हल्ले झाले. मला आता मरणाची भीती नाही. तुम्ही मर्द मराठे आहात. तुमच्यात दम नसेल तर मला सांगा, मी तिकडं येतो, असे एकेरीत उल्लेख करत अर्वाच्च भाषेचा वापर केला.

सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजेंवर टीका करताना शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची जीभ घसरली आहे. आपल्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ले झाले. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सांगा तिथं येईन, असं आव्हान नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना दिलं आहे. यावेळी उदयनराजेंना आव्हान देताना त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. महायुतीची काल साताऱ्याच्या कोरेगावात सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. साताऱ्यात उदयनराजे यांच्याविरोधात भाजपतून शिवसेनेत आलेले नरेंद्र पाटील रिंगणात आहेत. सभेत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना अर्वाच्च भाषेचा वापर करत खुलं आवाहन दिलं. उदयनराजेंनी केलेल्या विकास कामाबाबत सांगताना त्यांनी दुसऱ्याच्या पोराला आपलं नाव का देता, असं म्हणत स्वत:च्या पोराकड लक्ष देण्याचा सल्ला देखील दिला. यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले की, माझ्यावर दोनदा प्राणघातक हल्ले झाले. मला आता मरणाची भीती नाही.  तुम्ही मर्द मराठे आहात. तुमच्यात दम नसेल तर मला सांगा, मी तिकडं येतो, असे एकेरीत उल्लेख करत अर्वाच्च भाषेचा वापर केला. चौदा वर्षात टोलमुक्त सातारा होऊ शकला नाही. खासदार झाल्यानंतर सातारा जिल्हा टोलमुक्त करणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात डिफरंट कॅरेक्टर आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला की खामोश म्हटलं जातं. खासदारांना विकासावर बोलता येत नाही. टीव्ही चॅनेलवर 17 हजार कोटींचा विकास होता. पत्रकार परिषदेत 18 हजार कोटी झाला. आठ दिवसात हजार कोटी कसे वाढले हेच समजले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. विकास काम मोदींनी आणि आमच्या मंत्र्यांनी केली.  तुम्ही दुसऱ्याच्या पोराला आपल नाव का देताय, कृपाकरून आपण आपल्या पोराकडं पाहावं, असेही पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget