एक्स्प्लोर

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, 'रायसीना हिल' वर पाहुण्यांची मांदियाळी, सोहळ्यासाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था

या सोहळ्यासाठी विविध देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती एकाच स्थानी येणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या प्रोटोकॉलप्रमाणे सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून होणाऱ्या शपथविधीला आता अवघे काही तास उरले आहेत. नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी सात वाजता जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होतील. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेप्रमाणे व्यवस्था या सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. आर्मी, वायुसेना आणि दिल्ली पोलिसांच्या 10 हजाराहून अधिक जवानांची फौज या सोहळ्यासाठी तैनात करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी विविध देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती एकाच स्थानी येणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या प्रोटोकॉलप्रमाणे सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये परिसरातील इमारती आणि महत्वाच्या जागांवर वायुसेनेचे अँटी एअरक्राफ्ट गन आणि भारतीय सेनेच्या स्नायपरसोबत एनएसजीचे विशेष कमांडो आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात केले आहेत. जवळ असणाऱ्या हिंडन, पालमसह एअरफोर्स स्टेशनांवर देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी जवळपास एक हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. कामाचा दिवस असल्याने सामान्य लोकांना त्रास होऊ नये यासाठी तगडी व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधी समारोहासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या वाहनांच्या पार्किंगच्या जागांवर देखील चोख व्यवस्था करण्यात आली आहे. बिमस्टेक आणि अन्य 8 देशांच्या प्रमुखांसह तब्बल 8 हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी राष्ट्रपती भवनासमोर मोठा शामियाना उभारण्यात आला आहे.  या सोहळ्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून प्रमुख पाहुण्यांना खास मेजवानी देण्यात येणार आहे. दरम्यान, मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला रवाना झाले आहेत. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
Embed widget