एक्स्प्लोर

राजकीय कारकीर्द हिंसेची असलेल्या राणेंना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये : केसरकर

नारायण राणे 2 ऑक्टोबरला म्हणजेच महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर टीका केली. सिंधुदुर्गमध्ये 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केलं.

सिंधुदुर्ग : "भाजप प्रवेशासाठी नारायण राणे ज्या पद्धतीची लाचारी करत आहेत, ती कार्यकर्त्यांना आवडणारी नाही आहे. मुलांची आमदारकी शाबूत राहावी यासाठी ते कार्यकर्त्यांचा बळी देत आहेत. मात्र भाजपमध्ये जाण्यापूर्वी राणेंनी मागे वळून पाहिलं तर पाठीमागे कार्यकर्ते शिल्लक राहणार नाहीत, अशी त्यांची आजची परिस्थिती आहे," अशा शब्दांत गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर टीका केली. सिंधुदुर्गमध्ये 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केलं. राजकीय कारकीर्द हिंसेची असलेल्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश नको   नारायण राणे 2 ऑक्टोबरला म्हणजेच महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. "परंतु महात्मा गांधी अहिंसेचे पुजारी होते, त्याच दिवशी ज्यांची राजकीय कारकीर्द हिंसेची राहिली अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश देऊ नये," अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचंही दीपक केसरकर म्हणाले. तसंच शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचा ठाम विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सतीश सावंत खऱ्या अर्थाने गुलामगिरीतून मुक्त नारायण राणे यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू सहकारी सतीश सावंत यांनी काल (30 सप्टेंबर) महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. याविषयी दीपक केसरकर म्हणाले की, "सतीश सावंत खऱ्या अर्थाने गुलामगिरीतून मुक्त झाले. सतीश सावंत यानी स्वाभिमानाने घेतलेला निर्णय आहे. त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. राणेंना कार्यकर्ते सोडून जाण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. राणे म्हणतात भाजपमध्ये जाणार, मात्र भाजपमध्ये जाण्यापूर्वी राणेंनी मागे वळून पाहिलं तर पाठीमागे कार्यकर्ते शिल्लक राहणार नाहीत, अशी आजची त्यांची परिस्थिती आहे." राणेंचा भाजपप्रवेश घडणार नाही ज्या बाळासाहेबांनी राणेना घडवलं, त्यांच्याबद्दल त्यांनी जे केलेलं कृत्य आहे, त्याचा नियतीने घेतलेला हा सूड आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बाळासाहेबांना जर कुणी दुखावलं असेल तर ते नारायण राणेंनी. महाराष्ट्राची जनता, शिवसेना तसंच सर्वसामान्य कार्यकर्तेही कधी विसरणार नाहीत. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. राणेंनी कितीही तारखा मागू द्या, किंवा त्यांना तारखा मिळू द्या, राणेंचा भाजप प्रवेश घडणार नाही. राणेंना प्रवेश देऊन सिंधुदुर्गला दु:खात लोटू नका माझी राजकीय कारकीर्द पणाला लावून गेल्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा शांत ठेवला. मात्र राणेंना भाजपप्रवेश देऊन जिल्ह्यातील जनतेला पुन्हा त्याच दुःखात लोटून देणं हे कधीही हिताचं ठरणार नाही. अशा प्रवृतीला पुन्हा जिवंत करु नका, त्यांना भाजपमध्ये घेऊ नका, अशी विरोधाची भूमिका दीपक केसरकर यांनी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget