एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा, नारायण राणेंची टीका

उद्धव ठाकरे यांचा हा जळफळाट आहे. त्यांनी कोकणासाठी काय केलं. त्यांच्या मंत्र्यांनी काय कामं केली यावर बोलावं. कोकणाचा अभ्यास तरी आहे का यांना आणि यांच्या लोकांना. कोकणात येऊन कोकणी माणसावर आणि नारायण राणेंवर टीका केलेली लोकांना आवडणारे नाही, असेही राणे म्हणाले.

मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेच्या वाढीसाठी यांचे योगदान काही नाही. शिवसेना वाढीसाठी मी सर्व काही केलं आहे. हे आयत्या बिळावर नागोबा आहेत, असे भाजपचे खासदार  नारायण राणे यांनी म्हटले आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर पुन्हा टीका केली आहे. राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी कणकवलीमध्ये केलेले वक्तव्य जनतेला पटलेलं नाही. हे मैत्रीच्या गप्पा मारतात मात्र मैत्रीचा प्रामाणिकपणा यांनी ठेवला आहे का? युती करतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करतात. मैत्रीचं पावित्र्य यांनी जपलं आहे का?  भाजपला सल्ला देण्याचा यांना अधिकार आहे का? असा सवाल राणे यांनी केला आहे. मी जिथं जातो त्या पक्षाचे नुकसान होते असे उद्धव ठाकरे म्हणाले मात्र मी शिवसेनेत काम केले. काँग्रेसमध्येही मी प्रचार प्रमुख होतो. तिथंही पक्षप्रमुखाने सांगितलेलं काम केली. मी बाहेर येण्याने त्या पक्षाचे नुकसान झाले, असे राणे म्हणाले. माझ्यावर टीका करावी आणि मी स्वस्थ बसून ऐकावं असा नारायण राणे नाही. माझ्या मनात भरपूर काही आहे. मात्र ते वेळ आल्यावर बोलेन, असेही राणे म्हणाले. राणे म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांच्या आधीपासून शिवसेनेत अॅक्टिव्ह होतो. शिवसेनेच्या वाढीसाठी यांचे योगदान काही नाही. हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी ते शिवसेनेत आले. आम्ही आधीपासून काम केलं आहे, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा हा जळफळाट आहे. त्यांनी कोकणासाठी काय केलं. त्यांच्या मंत्र्यांनी काय कामं केली यावर बोलावं. कोकणाचा अभ्यास तरी आहे का यांना आणि यांच्या लोकांना. कोकणात येऊन कोकणी माणसावर आणि नारायण राणेंवर टीका केलेली लोकांना आवडणारे नाही, असेही राणे म्हणाले. शिवसेनेत नाव घेण्यासारखं काही शिल्लक नाही. आक्रमकता कुणाबरोबर करावी हे देखील महत्वाचे आहे. आता बरोबरीचे कुणी शिल्लक राहील नाही. मी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री जे सांगतील ते पाळलं जाईल. शिवसेनेत जसं एडजेस्ट झालो, काँग्रेसमध्ये जसे एडजेस्ट झालो तसेच भाजपमध्ये देखील एडजेस्ट होईल, असेही राणे म्हणाले. शिवसेनेने टीका केली तर मात्र उत्तर दिलं जाईल, असेही राणे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget