एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Narayan Rane Exclusive | शिवसेना सोडण्याचं कारण नारायण राणे आत्मचरित्रात उलगडणार
उद्धव ठाकरे माझे दुश्मन नाहीत, फक्त वैचारिक मतभेद आहेत, असं स्पष्टीकरण नारायण राणेंनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत दिलं.
![Narayan Rane Exclusive | शिवसेना सोडण्याचं कारण नारायण राणे आत्मचरित्रात उलगडणार Narayan Rane Exclusive Interview on revelations about Shivsena and Uddhav Thackeray in his Autobiography Narayan Rane Exclusive | शिवसेना सोडण्याचं कारण नारायण राणे आत्मचरित्रात उलगडणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/04125150/Narayan-Rane.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : खासदार नारायण राणे यांचं आत्मचरित्र लिहून तयार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आत्मचरित्रांतून अनेक गुपितं उघड करण्याचे संकेत राणेंनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिले आहेत.
शिवसेना का सोडली यामागचं खरं कारण चरित्रात आहे. उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला, ते या चरित्रात लिहिलं आहे, असंही नारायण राणेंनी सांगितलं.
शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा सर्व पक्षांमधील प्रवास लिहिल्याचं नारायण राणेंनी सांगितलं. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे माझे दुश्मन नाहीत, फक्त वैचारिक मतभेद आहेत, असं स्पष्टीकरण राणेंनी दिलं.
VIDEO | अब आएगा मजा, सबका हिसाब होगा, नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र
भाजप प्रवेशामागची सर्व कारणं पडद्यावर येतील असं सांगतानाच शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी युती धर्म कुठे पाळला आहे? असा सवालही नारायण राणेंनी विचारला.
"अब आएगा मजा, सबका हिसाब होगा" नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र
“माझे वडील नारायण राणे हे आत्मचरित्र लिहीत असून लवकरच त्याचे प्रकाशन होणार आहे. तर अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”, असं ट्वीट राणेपुत्र नितेश राणे यांनी केलं होतं. नारायण राणेंनी 1972 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात नारायण राणेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. आघाडीची सत्ता असताना 2005 साली त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)