Nandurbar District Vidhan Sabha Election 2024: नंदुरबार (Nandurbar) मतदारसंघाला भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हटलं जातं. नंदुरबार विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपेकीपैकी तिसरा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. त्यासाठी राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक राजकारणी रस्त्यावर उतरून आपल्या पक्षाचे दावे जनतेसमोर मांडत आहेत. नंदुरबारची (Nandurbar Jilha Vidhan Sabha Nivadnuk 2024) जागाही अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. भाजपा नेते विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघात 1962 पासून ते 1980 पर्यंतच्या काळात काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र 1995 नंतर भाजपने बाजी मारली आणि विजयकुमार गावित यांनी नंदुरबार मतदारसंघाला आपला बालेकिल्ला केला. नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ (Nandurbar District Vidhan Sabha Election) आहेत.
2019 च्या निवडणुकीत काय झाले?
2019 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले, तर भाजपच्या विजयकुमार गावित यांनी बाजी मारली. त्याचवेळी काँग्रेसने अनुभवी राजकारणी के.सी. पाडवी यांनाही उमेदवारी दिली होती. पाडवी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण गावित यांच्या 30 वर्षांच्या बालेकिल्ल्याची एक वीटही हलवता आली नाही. या निवडणुकीत गावित यांना एकूण 1,21,605 मते मिळाली, तर पाडवी यांना केवळ 51,209 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत गावित यांनी पाडवी यांचा तब्बल 70 हजार 396 मतांनी पराभव केला होता.
नंदुरबार जिल्ह्यातील लढती.....
1. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ,
के.सी पाडवी - काँग्रेस.
आमश्या पाडवी - शिवसेना (शिंदे गट).
हिना गावित - भाजपा - बंडखोर.
पदमाकर वळवी - भारतीय आदिवासी पार्टी.
चौरंगी लढत - या विधानसभा मतदार संघात भाजपच्या माजी खासदार हिना गावित यानी महायुतीचा उमेदवार समोर बंडखोरी केल्याने अडचणीत वाढ झाली आहे. ज्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत गावित यांना साथ दिली होती त्यांच्या विरोधात बंद खोली केल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे या मतदारसंघात चौरंगी लढत आहे.
2. शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघ,
राजेश पाडवी - विद्यमान आमदार - भाजपा.
राजेंद्र कुमार गावित - काँग्रेस
दुरंगी लढत - या मतदारसंघात दुरंगी लढत होत असून काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या समोर आहे, अत्यंत चुरशीची लढत होईल.
3. नंदुरबार विधानसभा मतदार संघ,
डॉ विजयकुमार गावित - भाजपा.
किरण तड़वी - कांग्रेस.
दुरंगी लढत - या मतदारसंघात दुरंगी लढत होत असून काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या समोर आहे अत्यंत चुरशीची लढत होईल.
4. नवापुर विधानसभा मतदार संघ,
शिरीष नाईक - काँग्रेस.
भरत गावित - राष्ट्रवादी (अजित पवार गट).
शरद गावित - अपक्ष.
तिरंगी लढत - या मतदारसंघात तिरंगी लढत असून अपक्ष उमेदवार शरद गावित राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे लहान बंधू आहेत. या मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या समोर महायुती आणि अपक्ष उमेदवाराच्या आव्हान जाणार आहे.
हेही वाचा>>>