मुंबई: मनोज जरांगे यांनी सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची घोषणा केली. मनोज जरांगे यांनी मराठा, मुस्लीम आणि दलित अशी तिहेरी मोट बांधून लढण्याचे ठरवले होते. मात्र, मित्रपक्षांनी उमेदवार निश्चित न केल्यामुळे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.  एकट्या मराठा जातीच्या बळावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. उद्या उमेदवार पडला तर मराठा समाजाची लाज जाईल. त्यामुळे आपण विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार नसल्याचे जाहीर केले होते. जरांगेच्या या निर्णयावर मनसेच्या प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी खोचक टिप्पणी केली आहे. 


मनोज जरांगे पाटील यांनी का माघार घेतली हे तेच स्पष्ट सांगू शकतात. जरांगे पाटील  यांना मुस्लिम धर्मगुरुंनी धोका दिला म्हणून त्यांनी निवडणूक उमेदवार न देण्याचा असा निर्णय घेतला असावा, असे मला वाटते. मुस्लिमांचं ठरलेलं आहे की कोणाच्या बाजूने मतदान करायचं आणि कोणाच्या विरोधात करायचा आहे.  मौलाना नौमानी यांचे जे वक्तव्य आहे, त्यातून हिंदूधर्म मानणाऱ्या  पक्षाच्या विरोधात मुस्लिमांना मतदान करायचा आहे. जे हिंदूंना आपलं मानतात त्यांच्या विरोधात मुस्लिम मतदान करणार हे निश्चित आहे. त्यामुळे हिंदूंनी सुद्धा याचा विचार करावा. 


मनोज जरांगे पाटील समाजासाठी काम करत आहेत आणि पुढे सुद्धा ते समाजासाठी काम करत राहतील. त्यामुळे समाजाचा विचार करून त्यांनी भूमिका घेतली असेल. लोकसभेसारखी परिस्थिती आता नाही. त्यामुळे  या भूमिकेचा फायदा तोटा कोणाला होईल हे सांगता येणार नाही. मुस्लिम धर्मगुरूंनी फारशी रुची जरांगे पाटील यांच्या सोबत जाण्याची दाखवली नाही. मुस्लिम धर्मगुरुंनी जरांगे पाटील यांना फसवले, असे माझे मत असल्याचे प्रकाश महाजन यांनी म्हटले.


प्रकाश महाजनांचा सदा सरवणकरांना टोला


माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकणाऱ्या सदा सरवणकर यांनी माघार घेण्याचे संकेत दिले होते. मनसेने महायुतीविरोधातील उमेदवार मागे घेण्याची तयारी दाखवल्याने मी माहीममध्ये माघार घ्यायचे की नाही, हे माझ्या कार्यकर्त्यांना विचारुन मी ठरवेन, असे सरवणकर यांनी म्हटले. यावरुन प्रकाश महाजन यांनी सरवणकरांना टोला लगावला. कुठला तर्क सदा सरवणकर  लावत आहेत.  सदा सरवणकर  यांना आम्ही कधीच म्हटलं नाही की तुम्ही अर्ज मागे घ्यावा .आम्ही कुठेही विनंती सदा सरवणकर केली नाही. स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी सदा सरवणकर  वक्तव्य करतात . आम्ही लढणार आहे हे निश्चित पण आम्ही सरवणकर यांना  कधीच म्हटलं नाही तुम्ही अर्ज मागे घ्या, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले. 



आणखी वाचा


मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या


Manoj Jarange: मनोज जरांगे काल रात्री ढसाढसा रडले, उमेदवार देणार म्हणाले; आज थेट निवडणुकीतून माघार, नेमकं काय घडलं?