Manoj Jarange Patil On Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) माघार घेतली आहे. काल म्हणजेच 03 नोव्हेंबर रोजी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कोण-कोणत्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार, याबाबत माहिती दिली होती. तसेच यावेळी मनोज जरांगे ढसाढसा रडल्याचे देखील दिसून आले. मात्र आज सकाळी अचानक निवडणुकीतून माघार घेत असल्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी जाहीर केला. 


मुस्लिम आणि दलित उमेदवारांची यादी न आल्यामुळे आणि एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत म्हणून आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच आता आपल्याला पाडापाडी करावी लागणार असंही मनोज जरांगे म्हणाले. एका जातीवर धाडस करणे शक्य नाही. मी मतदारसंघ ठरवले होते, फक्त उमेदवार ठरवायचे होते. राजकारणाची प्रक्रिया वेगळी, आणि सामाजिक कार्याची प्रक्रिया वेगळी आहे. त्रास देणाऱ्यांना मराठ्यांनी सोडायचं नाही, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं. तसेच उमेदवारांनी अर्ज मागे घ्या, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. कोणाच्या प्रचाराला आणि सभेला जाऊ नका, अशा सूचना देखील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला दिल्या. 


काल रात्री पत्रकार परिषदेत रडले, काय काय म्हणाले?


काल रात्री मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपले मतदान जास्त असेल त्याच मतदारसंघ लढायचे आहेत. दलित -मुस्लिम सोबत आहेत. मात्र, जिथं आमची ताकद आहे, त्याच जागा लाजा लढणार आहोत. एका जिल्ह्यात एक किंवा दोन लढणार आणि बाकीच्या पाडणार आहोत. 15-20 जागा लढवणार, मुस्लिमांच्या दोन तीन , दलितांच्या दोन तीन असतील असा अंदाज आहे. अजून एक दोन किचकट प्रश्नांवर आमची चर्चा सुरू आहे. आमच्या गोरगरीब मुलांना. त्रास द्यायचा प्रयत्न करू नका. आम्हाला राजकारण हवस म्हणून करायचे नाही. कोणीही बळच हट्ट करू नका, असं मनोज जरांगे म्हणाले होते.  सत्ताधाऱ्यांना मी सोडणार नाही, समाजाला संपवणाऱ्याना संपवणार आहोत. मी बदला घेणार, मी नेत्या सारखं भेसळ जगणर नाही. माझं कुटुंब सुद्ध मला माहिती नाही, माझं मुल, माझा बाप कुठं आहे,हे मला माहिती सुध्दा नाही. माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याला सोडणार नाही. यांना पायाखाली तुडवा, कोण कोणाचा नेता आणि नाही. दलित मुस्लिम मराठा समीकरण झाले आहे. उद्या त्यांचे मतदारसंघ ते आम्हाला देतील, असंही मनोज जरांगे म्हणाले होते. मात्र आज थेट निवडणुकीतून माघार घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. 


गुपचूप जा आणि पाडा, जरांगेंची निवडणुकीतून माघार, पाडापाडीवर ठाम, Video: