Devendra Fadnavis On BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) आम्ही लांबवल्या नाहीत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळेच लांबल्या आहेत, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. तसंच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील, असा अंदाजही देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला. एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी 29 जून रोजी ही मुलाखत एएनआयला दिली होती.


'ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील'


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही निवडणुका लांबवल्या नाहीत. निवडणुका व्हाव्यात असं आम्हालाही वाटतंय. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने भरपूर याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत, आरक्षणाबाबतची एक याचिका सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र केल्या आहेत आणि स्टेटस को दिला आहे. या स्टेटस कोमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत.  ज्यावेळी स्टेटस को हटेल आणि निकाल येईल तेव्हा निवडणुका होतील. उद्धवजी बोलतात की तुम्ही निवडणुका का घेत नाही तेव्हा मला आश्चर्य वाटतं. तुम्ही याचिका दाखल केल्या आहेत, तुम्ही त्या मागे घ्या. स्टेटस को हटेल. दोन्ही बाजूंनी का बोलता? हे राज्य सरकारच्या हातात नाही. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निकाल येईल आणि निवडणुका पण होतील."


मनपा निवडणूक शिवसेनेसोबत लढणार


"महापालिका निवडणुका आम्ही शिवसेनेच्या सोबत लढणार आहोत," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच महाविकास आघाडी स्ट्रॅटेजिक अलायन्स करेल.  याचा अर्थ म्हणजे काही ठिकाणी युती केली तर त्यांचं नुकसान होईल आणि आम्हाला फायदा होईल. अशा ठिकाणी ते स्वतंत्र लढतील, असं ते म्हणाले. 


'मुंबई 150 चा नारा कायम, मुंबई जिंकणारच'


"जेपी नड्डा यांनी दिलेला मुंबई 150 हा आमचा नारा कायम आहे. मुंबई जिंकणार आणि चांगल्या पद्धतीने जिंकणार. हिंदुत्त्व हा निवडणुकीचा मुद्दा नाही. ती आमची विचारधारा आहे. आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत. त्यावर आम्ही मतं मागत नाही, विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतो. मागी निवडणुकीतही आम्ही मोठी मुसंडी मारली होती. त्यावेळी संपूर्ण प्रचारातील भाषणात मी विकासाचा मुद्दा मांडत होतो," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.   


VIDEO : देवेंद्र फडणवीस यांनी एएनआयला दिलेली मुलाखत



हेही वाचा


Mumbai Municipal Corporation Election: महानगरपालिका निवडणुका घ्यायला तुमची का फाटते?; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा