Sanjay Raut On Municipal Corporation Elections : राज्यातील अनेक महानगरपालिकेचा कालवधी संपला असताना देखील, निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी प्रलंबित आहे. दरम्यान यावरूनच पुन्हा एकदा शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) प्रलंबित असून, ही निवडणुक घ्यायला तुमची का फाटते असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तर न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवता असेही संजय राऊत म्हणाले आहे. 


काय म्हणाले संजय राऊत? 


दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणुका घ्यायला तुमची का फाटते? एवढच सांगा. निवडणूक घ्या, पळ का काढत आहेत. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवत आहात. न्यायालयाचं गैरवापर सुरु आहेत. न्यायालयावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे मैदानात या, मैदान सोडून का पळत आहेत. दिल्लीच्या फौजा इकडे बोलवणार, कर्नाटकात देखील तुम्ही 200 जागा जिंकणार होतात. तिथे पंतप्रधानापसून सर्व फौज उतरवली, फक्त राष्ट्रपतीच बाकी ठेवले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी 150 ची भाषा केली असेल, पण आम्ही त्यांना 60 च्या आतच ऑल आउट करू असेही संजय राऊत म्हणाले. 


नोटबंदीमुळे 40 आमदार देखील हैराण


तर दोन हजाराच्या नोटबंदीवरून देखील पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधला. राज्यातील सद्याच्या महाराष्ट्रातील सरकारमध्ये आणि भाजपकडे ब्लॅकचा पैसा पडलेला आहे. शेतकऱ्यांच्या आणि कष्टकराच्या खिशात दोन हजाराची नोट आहे. तर ते सर्व 40 आमदार देखील हैराण आहेत. सर्व दोन हजारांच्या नोटाचा व्यवहार झाला आहे खोक्यांचा, आता त्या खोक्यांचं करायचं काय यासाठी मोठी धावपळ चालली आहे. 


अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया...


महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान यावरच बोलताना संजय राऊत म्हणाले की, सर्वांचे डीएनए टेस्ट करावे लागतील. लहान भाऊ आणि मोठा भाऊ असा विषय शिवसेना भाजपच्या युतीत देखील आला होता. तेव्हा देखील म्हणालो होतो की, डीएनए टेस्ट करावे लागतील.पण महाविकास आघाडीमध्ये असे कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे कोण काय म्हणतो यापेक्षा सर्वजण आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ajit Pawar on Congress: काँग्रेसपेक्षा आम्ही मोठे भाऊ झालो आहोत; अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय भूवया उंचावल्या!