नागपूरः खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट असून तेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहे. भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजे शिंदे गट आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. वृत्त वाहिन्यांवर मनता येते तशी बातमी दाखविली जाते आणि त्याचा ज्याला जो अर्थ काढायचा आहे तसे अर्थ काढले जातात, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.


यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation election 2022) निवडणूकीवर केलेल्या विधानावर फडणवीस म्हणाले, मी असं सांगितलं की कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातली शेवटची निवडणूक आहे, असं समजून जेव्हा तुम्ही झोकुन देता, तेव्हाच आपल्याला ती निवडणूक जिंकता येते. माझे वाक्य फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी नव्हते, तर प्रत्येक निवडणुकीच्या एकंदरीत रणनीती संदर्भात होते, असे स्पष्टीकरणही यावेळी फडणवीस यांनी दिले.


सरकारी कार्यालये आदेशाने चालतात म्हणून...


महाराष्ट्र आणि देशामध्ये ज्योतिबा फुले (Jyotiba Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा जो मान आहे तो खूप मोठा आहे. सगळ्यांच्या मनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आहे. त्यामुळे फोटो लावण्याची अनिवार्यता करण्याची गरज नाही. मात्र सरकारी कार्यालय नियमाने, आदेशाने चालतात. त्यामुळे आदेश काढले असल्याचे यावेळी फडणवीस म्हणाले.


राज ठाकरे- शिंदे गटातील जवळीकता वाढली, मनसे- शिंदे गट निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता


भाजपचा मिशन इंडिया


भारतीय जनता पक्षाचा मिशन इंडिया (BJP Mission India) आहे. तसेच महाराष्ट्र भाजपचा मिशन महाराष्ट्र आहे. तसेच बारामती हे महाराष्ट्रात आहे. म्हणून बारामती मिशन (Mission Baramati) महाराष्ट्र मध्ये आहे, असेही फडणवीस म्हणाले. तसेच लास्ट फ्रंटीयर वगैरे काही नसतं. आमच्यासाठी राज्यातील प्रत्येक जागा महत्वाची आहे. आम्ही प्रत्येक जागेचे नियोजन करतो. मात्र अनेकांकडून वेगळे तर्क लावण्यात येतात असेही यावेळी ते म्हणाले. बारामतीमध्ये पक्षाला बळकट करण्यासाठीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पक्ष गावा-गावात बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या


BMC Election : मुंबई महापालिकेसाठी भाजपचं टार्गेट 150, कसा आहे 'मिशन मुंबई' मेगा प्लान?