Mukhed Vidhan Sabha constituency : विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नांदेड जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. आज आपण मुखेड विधानसभा मतदारसंघाची (Mukhed Vidhan Sabha constituency) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघातून भाजप आमदार तुषार राठोड (Tushar Rathore) हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगमात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात हणमंत पाटील बेटमोगरेकर (Hanmant Patil Betmogrekar) (काँग्रेस) विरुद्ध बालाजी खतगावकर (Balaji Khatgaonkar) (बंडखोर शिंदे शिवसेना) हे निवडणूक लढवत आहेत.


मुखेड मतदारसंघात तिरंगी लढत होणार


मुखेड विधानसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील लढत ही तिरंगी लढत होत आहे. भाजपने पुन्हा एकदा तुषार राठोड यांना मैदानात उतरवले आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून हणमंत पाटील बेटमोगरेकर हे निवडणूक लढवत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे बालाजी खतगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. या बंडखोर उमेदवारानं विद्यमान आमदाराचं आणि काँग्रेस उमेदवार हणमंत पाटील यांचं टेन्शन वाढवलं आहे. दरम्यान, विद्यमान आमदार तुषार राठोड यांनी निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेच मतदारसंघात जनसंपर्क अभियान राबवले आहे. गावोगावी मेळावे घेतले, सरकारी योजनांचा माहिती देखील दिली होती. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुखेड मतदारसंघात काय स्थिती होती?


मुखेड विधानसभा मतदारसंघातील 2019 च्या निवडणुकीत भाजपने तुषार गोविंद राठोड यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यांना काँग्रेसने भाऊसाहेब कुशल राव पाटील यांना आव्हान देण्यासाठी मैदानात उतरवले होते. त्या वेळी दोन्ही पक्षांमध्ये कडवी लढत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, निकाल सर्वांना धक्का देणारा होता. भाजपच्या तुषार राठोड यांना 102573 मते मिळाली, तर काँग्रेसचे कुशल राव पाटील यांना 70710  मते मिळाली. तुषार राठोड यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.


मुखेड विधानसभा मतदारसंघात दलित मतदारांची संख्या जास्त


मुखेड विधानसभा मतदारसंघात सर्वच समाजाची मते आहेत. मात्र, दलित समाजाची मतांची संख्या ही जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मतदारसंघात दलित समाजाची 22 टक्के मते आहेत. आदिवासी समाजाचा मते 6 टक्के इतका आहे, तर मुस्लिम समाजाची मते साधारणपणे 7 टक्के मते आहेत. या मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण मतदारांची तुलना केली असता, 93 टक्के ग्रामीण मतदार आहेत, तर बाकीचे शहरी मतदार आहेत. यामुळे या जागेच्या राजकीय समीकरणांवर ग्रामीण आणि दलित मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Nanded Assembly Election : नांदेड जिल्ह्यातल्या 9 मतदारसंघाचं चित्र स्पष्ट, बंडखोरांमुळं रंगत वाढली, कोण मारणार बाजी?